MLA Kunal Patil speaking in Congress meeting. Neighbor Shyamkant Saner and officials. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: जिल्ह्यात काँग्रेसची 3 ते 12 सप्टेंबर जनसंवाद पदयात्रा! सहभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व यशस्वी झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात तीन ते १२ सप्टेंबरदरम्यान काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे.

पदयात्रेत जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी केले.

सहभागी होण्यासाठी काँग्रेस भवनात नावनोंदणी करणे आवश्यक आहे, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पदयात्रेत आमदार कुणाल पाटील, अश्‍विनी कुणाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर पूर्णवेळ सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्हह्यात दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव एकमताने बैठकीत करण्यात आला. (3rd to 12th September mass communication padayatra of Congress in district Call for participation Dhule News

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने जनता त्रस्त झाली असून, त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे व खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे.

धुळे जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आणि कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, अशी माहिती धुळ्यातील काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत देण्यात आली.

बैठकीत दुष्काळाचा व तातडीने मदतीचा ठराव झाला. माजी खासदार बापू चौरे, जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, अश्‍विनी पाटील, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, धुळे शहर-जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, नगरसेवक साबीर खान,

ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, ज्येष्ठ नेते गुलाबराव कोतेकर, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, रणजित पावरा, उत्तमराव देसले,

भानुदास गांगुर्डे, पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे उपाध्यक्ष योगेश पाटील, संचालक एन. डी. पाटील, शकील अहमद, मुझफ्फर हुसैन, प्रमोद सिसोदे, दीपक साळुंके, माजी संचालक प्रकाश पाटील, अशोक सुडके,

डॉ. दत्ता परदेशी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, मधुकर पाटील, रावसाहेब पाटील, राजीव पाटील, छोटूभाऊ चौधरी, डॉ. संदीप पाटील, भानुदास माळी, ज्येष्ठ नेते भिका पाटील, सोमनाथ पाटील,

पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अलोक रघुवंशी, प्रा. मुकेश पाटील, राजेंद्र खैरनार, एकनाथ वाघ, महिला तालुकाध्यक्षा संध्याताई चौधरी, अर्चना पाटील, शहराध्यक्षा बानुबाई शिरसाठ, छायाबाई पाटील, अलकाबाई बिऱ्हाडे, यामिनी पाटील, भटू महाले आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी असेल यात्रा

३ ते १२ सप्टेंबरदरम्यान पदयात्रा जिल्ह्यातील विविध गावांतून मार्गक्रमण करेल. सकाळी सहाला प्रार्थनेने पदयात्रेला सुरवात होईल.

सकाळी साडेनऊपर्यंत पदयात्रा, बारापर्यंत विश्रांती व कार्यकर्त्यांशी चर्चा, दुपारी जाहीर सभा, जनतेशी संवाद, सायंकाळी सातपर्यंत पदयात्रा, त्यानंतर जाहीर सभा आणि रात्री मुक्काम असे नियोजन आहे. दहा दिवस पदयात्रा चालेल. यात्रेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT