Parag Pashte, Provincial President of Congress Kisan Division, while giving information in a press conference about Kisan Samvad Padayatra. Neighboring State Secretary Devaji Chaudhary etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Kisan Samvad Padayatra : नंदुरबारमधून 4 ला किसान संवाद पदयात्रेस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

Kisan Samvad Padayatra : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटींतर्गत प्रदेश किसान काँग्रेस विभागाची शेतकरी संवाद यात्रेची सुरवात नंदुरबार जिल्ह्यापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे. (4 december Kisan Samvad Padyatra started from Nandurbar news)

या वेळी काँग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदार, विविध सेलचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस किसान विभागाचे प्रांताध्यक्ष पराग पाष्टे, काँग्रेस किसान विभागाचे प्रदेश सचिव देवाजी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. धान, कापूस, ऊस, सोयाबीन व इतर पिकांच्या विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे; परंतु सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तिळमात्र लक्ष द्यायला तयार नाही.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून राज्यातील शेतकऱ्याच्या विविध समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटींतर्गत असलेल्या प्रदेश किसान काँग्रेस विभागाची ४ ते ११ डिसेंबर २०२३ यादरम्यान शेतकरी संवाद यात्रा होणार आहे.

ही यात्रा ४ डिसेंबरला नंदुरबार जिल्ह्यातून सुरू होऊन ११ डिसेंबरला यात्रेचे नागपूर येथे मोर्चात रूपांतर होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हाध्यक्ष व आमदार शिरीषकुमार नाईक, सुभाष पाटील, दिलीप नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी जास्तीत जास्त काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT