Devotees queuing for darshan of Shri Kanhayalal Maharaj. In the second photograph, the crowd of devotees gathered in the Yatrotsav area. The palanquin procession of Shri Kanhayalal Maharaj.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Kanhaiyalal Yatrotsav : कार्तिकी एकादशीनिमित्त पालखी मिरवणूक; 4 लाख भाविक नतमस्तक

सकाळ वृत्तसेवा

Kanhaiyalal Yatrotsav : येथील कन्हय्यालाल महाराज यांच्या कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ होणाऱ्या यात्रोत्सवासाठी गुरुवारी (ता. २३) सुमारे चार लाखांहून अधिक भाविक कन्हय्यालाल महाराजांसमोर नतमस्तक झाले.

सकाळी पाचपासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर दुपारनंतर गर्दीने उच्चांक गाठला. (4 lakh devotees bow down to Kanhaiyalal yatrotsav dhule news)

टाळमृदंगाचा गजर व कन्हय्यालाल महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. काही भाविकांनी नवसपूर्ती केली. पुढील दोन दिवस भाविकांची दर्शनास व खरेदीसाठी गर्दी राहणार आहे. सकाळपासून श्री कन्हयालाल महाराजांची पालखी मिरवणूक मंदिर, यात्रोत्सव परिसर व आमळी गावातून निघाली भाविकांनी दर्शन घेतले.

दरम्यान, गुजरात मध्य प्रदेशसह राज्याच्या कान्याकोपऱ्यातून येथे भाविक दाखल झाले. आमळीकडे येणाऱ्या सर्व बाजूकडील रस्ते, एसटी बस, खासगी वाहने व पदयात्रेकरूंची गर्दी ओसंडून वाहत आहे. व्यावसायिक पंधरा दिवसांपासून दाखल झाले. आजच्या दिवसाची अर्थात एकादशीची वाट पाहत होते.

यात्रोत्सव परिसरात पाय ठेवायलाही जागा नाही. खरेदीसाठीही मोठी गर्दी दिसून येत आहे. यात्रोत्सवात पूजेचे साहित्य, फुले, नारळ, संसारोपयोगी साहित्य, तांब्या-पितळेची भांडी, कपडे व खाद्यपदार्थ खजूर आणि उंच पाळणे, मौत का कुवा व विविध मनोरंजनाच्या साधनांकडेही प्रचंड गर्दी उसळली होती.

या स्थितीमुळे विक्रमी उलाढाल होत असल्याने व्यावसायिकांत समाधानाचे वातावरण दिसून आले. अनेकांचा संसारोपयोगी साहित्य खरेदीकडे कल होता, त्यातून तब्बल दहा कोटींवर उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वत्र चोवीस तास पोलिस बंदोबस्त असून, पोलिस अधिकारी तळ ठोकून आहेत. याशिवाय वैद्यकीय पथक, वीज वितरण कंपनीचे अधिकारी सोनल नागरे व कर्मचारी, एसटीचे आगारप्रमुख बुधवारपासून तळ ठोकून आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. यात्रेचा गुरुवारचा व शुक्रवार (ता. २४)चा मुख्य दिवस आहे. सर्वच रस्त्यांवरील प्रचंड गर्दीमुळे वाहन पार्किंगच्या समस्येला अनेक भाविकांना सामोरे जावे लागत आहे.

थंडीतही भाविकांची गर्दी

आमळीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ती रात्री उशिरापर्यंत कायम होती. भाविक एसटीसह खासगी वाहनांनी दाखल होत आहेत. काही भाविक आजही पायी दिंड्यांनी दाखल होत आहेत. राज्यासह लगतच्या गुजरातमधील भाविक कुटुंबीयांसाह दाखल झाले आहेत.

बहुतांश भाविक रात्री मुक्कामी थांबून यात्रोत्सवाचा आनंद घेतात. अशातच शाळांना सुट्या असल्याने गर्दीने उच्चांक गाठला आहे. आमळीसह परिसर सध्या कडाक्याच्या थंडीने गारठला असला तरीही गर्दी कायम आहे.

यात्रोत्सवातील मिठाईचे दर (किलोत) ः

नायलॉन गोडशेव- १६०, जिलबी १६०, पेढे ४००, मैसूर पाक २००, बर्फी १६०, बालूशाही- २१०, शेव २४०, पापडी २५०, खजूर १००. नंदुरबार येथील खानदेशी हॉटेलचे हारून हलवाई व फिरोज रसीद हलवाई, सादिकभाई हलवाई यांनी ही माहिती दिली. दिवसभरात आठ ट्रक केळी, तीन ट्रक अननस व चार ट्रक नारळ विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates : अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT