Municipal confiscation team while sealing the shop. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : धुळ्यात 4 दुकाने सील; मनपाच्या जप्ती पथकाची करवसुलीप्रश्‍नी कारवाई

महापालिकेने मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : महापालिकेने मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार बड्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. पथकाने शहरात बुधवारी (ता. १४) गल्ली क्रमांक दोनमधील चार दुकाने सील केली. दिवसभरात थकबाकी भरण्याचे आश्‍वासन देणाऱ्यांवरील कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली.

आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या जप्ती पथकाने मालमत्ता करवसुलीला वेग दिला आहे. (4 shops sealed in Dhule Tax collection action of municipality confiscation team news)

वारंवार नोटीस बजावूनही थकबाकी न भरणाऱ्यांचे दुकान सील केले जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या जप्ती पथकाने गल्ली क्रमांक दोनमधील डॉ. विजय देशमुख यांची दोन दुकाने सील केली.

त्यांच्याकडे एकूण ७० हजार ३५१ रुपयांची थकबाकी होती. डॉ. विजय देशमुख भोगवटाधारक बावस्कर यांच्याकडेही ७० हजार ३५१ रुपयांची थकबाकी होती.

त्यामुळे त्यांची दोन दुकाने सील करण्यात आली. श्री मरीमाता मंदिरासमोरील खंडेलवाल यांच्याकडे चार लाख ५९ हजार ९२४ रुपयांची थकबाकी होती.

त्यांचेही दुकान सील करण्यासाठी जप्ती पथक गेले. त्यांनी दुपारपर्यंत थकबाकी भरण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली.

नागरिकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी भरून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले.

ही कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, निरीक्षक मोरे, मधुकर वडनेरे, अनिल सुडके, वरिष्ठ सहाय्यक किशोर वाघ, सचिन पवार यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT