dhule market committee esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Market Committee Election : साक्री बाजार समितीसाठी 41 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी माघारीनंतर ४१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बाजार समितीच्या १८ जागांसाठी १३१ अर्ज दाखल झाले होते, पैकी ९० इच्छुकांनी माघार घेतल्याने आता अंतिम ४१ उमेदवार रिंगणात आहेत. (41 candidates in election for Sakri market Committee dhule news)

निवडणुकीत दोन पॅनल तयार झाले असले तरी यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा भरणा आहे. यात प्रामुख्याने यंदा बळीराजा विकास पॅनल आणि शेतकरी विकास पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

बळीराजा विकास पॅनलतर्फे सेवा सहकारी संस्था मतदारसंघात बन्सीलाल बाविस्कर, दीपक साळुंके, ऋतुराज ठाकरे, शाईराम अहिरे, भानुदास गांगुर्डे, नंदकुमार खैरनार, लादूसिंग गिरासे, महिला राखीव गटात कलाबाई बेडसे, जिजाबाई सावळे, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय गटात रवींद्र ठाकरे, अनुसूचित जमाती गटात वसंत पवार, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात ज्ञानेश्वर पवार, मुकुंदराव घरटे, ग्रामपंचायत अनुसूचित जमाती गटात ओंकार राऊत, आर्थिक दुर्बल गटात किरण देवरे, हमाल तोलारी गटात दिनकर बागूल, व्यापारी अडते गटात राजेंद्र शहा व किरण कोठावदे उमेदवार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शेतकरी विकास पॅनलमध्ये सेवा सहकारी संस्था गटात हंसराज पाटील, भूषण ठाकरे, विनायक अकलाडे, सरदार पाटील, प्रवीण भामरे, मंगेश नेरे, पंकज पाटील, महिला राखीव गटात आशाबाई नेरकर, पुष्पाबाई बच्छाव, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीयामध्ये चंद्रकांत पवार,

अनुसूचित जाती जमाती वसंत पवार, ग्रामपंचायत सर्वसाधारण गट जितेंद्र बिरारीस, अजय सोनवणे, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती गटात प्रियंका बारिस, आर्थिक दुर्बल गटात भास्कर पवार, व्यापारी गटात पंडित बदामे, राजेंद्र टाटिया, तर हमाल-मापारी गटात संजय माळीच हे उमेदवार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT