Aspirants present to file application at centers in Tehsil Office.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election : शेवटच्या दिवशी उमेदवारांची ‘भाऊगर्दी’; सदस्यपदासाठी 423 अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Gram Panchayat Election : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अपवाद वगळता चुरस शिगेला पोचली असून, सरपंचपदासाठी ७७, तर सदस्यपदांसाठी तब्बल ४२३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. २३ ऑक्टोबरला प्राप्त अर्जांची छाननी होणार असून, २५ ऑक्टोबर ही माघारीची अखेरची मुदत आहे.

स्वत:ला अडथळा आणणाऱ्या इच्छुकांची समजूत काढण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींना शुक्रवारी (ता. २०) सायंकाळपासूनच वेग आला आहे.(423 applications of candidates for gram panchayat membership on last day dhule news)

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या १५, तर ५१ प्रभागांतील १४३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. वासर्डी (ता. शिरपूर) येथील तीन प्रभागांच्या चार जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. १६ ऑक्टोबरपासून निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या मुदतीला सुरवात झाली. सुरवातीचे दोन दिवस निरंक गेल्यानंतर १८ ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सरपंचपदासाठी ३०, तर सदस्यपदासाठी १७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यासह सरपंचपदासाठी एकूण ७७, तर सदस्यपदासाठी ४२३ अर्ज दाखल झाले. वासर्डी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे आताही तेथील जागा रिक्तच राहणार आहेत. गिधाडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने तेथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होईल हे स्पष्ट आहे.

ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाचे आरक्षण, सरपंचपद व सदस्यपदासाठी दाखल अर्जांची संख्या ः

बभळाज (नामाप्र स्त्री) ३, १७, गिधाडे (नामाप्र) १, १२, तरडी (अनुसूचित जमाती स्त्री) ६, २९, कुरखळी (नामाप्र स्त्री) ५, २८, वाडी खुर्द (अनुसूचित जमाती) ३, ८, नांथे (सर्वसाधारण) ६, २६, आमोदे (अनुसूचित जमाती स्त्री) ४, ४९, ताजपुरी (अनुसूचित जमाती स्त्री) ४, २५, खर्दे बुद्रुक (सर्वसाधारण) ३, २२, उंटावद (सर्वसाधारण स्त्री) ३, २०, अंतुर्ली (सर्वसाधारण स्त्री) ९, ३१, लोंढरे (सर्वसाधारण स्त्री) ५, १७, खामखेडा प्र.था. (सर्वसाधारण) ४, २९, टेंभेपाडा (अनुसूचित जमाती) १५, ५३, उमर्दा (अनुसूचित जमाती स्त्री) ६, ४७.

शिंदखेडा तालुक्यातील सरपंचपदासाठी ७५, सदस्यपदासाठी ३६८ उमेदवारी अर्ज दाखल

शिंदखेडा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी ७५ व ४१ प्रभागांतून ११३ सदस्य निवडून देण्यासाठी ३६८, तसेच तालुक्यातील पोटनिवडणुकीसाठी तीन ग्रामपंचायतींच्या पाच प्रभागांतून एक उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आला आहे.

तावखेडा (प्र. बेटावद) सरपंचपदासाठी ९, सदस्यपदासाठी २१, वालखेडा सरपंचपदासाठी ११ व सदस्यपदासाठी ५०, कदाणे सरपंचपदासाठी ७ व सदस्यपदासाठी २३, कंचनपूर सरपंचपदासाठी ९ व सदस्यपदासाठी ३१, वाघोदे सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी २३, परसामळ- कुमरेज सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी १५, साळवे सरपंचपदासाठी ५ व सदस्यपदासाठी ३३, वाडी सरपंचपदासाठी ४ व सदस्यपदासाठी २१, होळ (प्र. बेटावद) सरपंचपदासाठी ६ व सदस्यपदासाठी २८, अंजनविहिरे सरपंचपदासाठी ६ व सदस्यपदासाठी २६, गव्हाणे-शिराळे सरपंचपदासाठी २ व सदस्यपदासाठी २२, मांडळ सरपंचपदासाठी ७ व सदस्यपदासाठी ४८ व पथारे सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी २७ उमेदवारी अर्ज आजच्या शेवटच्या दिवशी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT