Tuberculosis Patients sakal
उत्तर महाराष्ट्र

TB Free India Mission : ‘निक्षय मित्रां’कडून धुळ्यात 463 क्षयरुग्ण दत्तक

सकाळ वृत्तसेवा

TB Free India Mission : प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत गेल्या वर्षभरात १०५ निक्षय मित्रांनी महापालिका क्षेत्रातील ४६३ क्षयरुग्णांना पोषण आहार पुरविण्यासाठी दत्तक घेतले.

या रुग्णांना निक्षय मित्रांकडून एक हजार ४५३ पोषण आहार किट उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान, अद्यापही जवळपास ४०० क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दानशूर निक्षय मित्रांची गरज आहे. इच्छुक दानशूरांनी त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे लक्ष्य आहे. (463 Tuberculosis patients adopted in Dhule by Nikshay Mitra in TB Free India Mission news)

त्या अनुषंगाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेचा ९ सप्टेंबर २०२२ ल प्रारंभ केला. या योजनेंतर्गत कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट्स हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे.

या योजनेत सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत ‍निक्षय मित्र बनून त्यांच्या वतीने क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार पुरविण्यात येतो. त्या अनुषंगाने धुळे महापालिका कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, खासगी हॉस्पिटल, मेडिकल, शाळा, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगसमूह, बँका व विविध संस्था, महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभागातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी अशा १०५ घटकांनी निक्षय मित्र होऊन सहभाग नोंदविला.

या १०५ निक्षय मित्रांनी ४६३ क्षयरुग्णांना पोषण आहार देणेकामी दत्तक घेतले आहे. वर्षभरात या निक्षय मित्रांच्या माध्यमातून क्षयरुग्णांना एक हजार ४५३ ‍पोषण आहार किट (गहू- पाच किलो, शेंगदाणे- अर्धा किलो, गूळ- एक किलो, तेल- एक किलो, मठ- एक किलो, मूग- एक किलो) दरमहा पुरवठा करण्यात आला.

यासाठी धुळे महापालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील व शहर क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी वेळोवेळी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांच्या भेटी घेऊन त्यांना निक्षय मित्र बनविण्याकामी परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चारशे रुग्णांना मदतीची गरज

धुळे शहरात एकूण ९५२ क्षयरुग्ण उपचार घेत असून, यातील जवळपास ४०० क्षयरुग्णांना अद्यापही पोषण आहाराची गरज आहे. त्यासाठी ९ ते २३ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या पंधरवड्यात जास्तीत जास्त दानशूर व्यक्ती, संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, निक्षय मित्र व्हावे, प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानात सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त विजय सनेर, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पाटील आदींनी केले आहे. इच्छुकांनी मदतीसाठी शहर क्षयरोग दुरीकरण केंद्र (कृष्णनगर, मोगलाई, साक्री रोड, धुळे) येथे (०२५६२-२७८३२२) संपर्क साधावा.

एका रुग्णाकडून दहा रुग्णांना मदत

दरम्यान, कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट्स या उपक्रमात धुळे शहरातील राऊळवाडी परिसरातील उपचारावर असणाऱ्या एका आर्थिक सक्षम क्षयरुग्णाने योजनेची माहिती घेऊन इतर दहा क्षयरुग्णांना स्वत: पोषण आहार देणेकामी दत्तक घेतले. महाराष्ट्रातील अशी ही एकमेव घटना असावी असे धुळे शहर क्षयरोग विभागाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT