Officers and team present during the interrogation along with the suspects of Ner in the custody of Taluka Police Station.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : जुन्या वादातून नेरची शांतता धोक्यात; 5 गुन्हेगारांना पुण्यातून अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : जुन्या वादातून नेर (ता. धुळे) येथील सलोख्यासह शांतता धोक्यात आणणाऱ्या संशयित पाच जणांना धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने पुण्याहून जेरबंद केले.

जिल्ह्यासाठी संवेदनशील ठरलेल्या या घटनेप्रकरणी तपासाच्या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यातर्फे अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी तालुका पोलिस ठाण्याच्या शोधपथकाला पंधरा हजारांचे रोख पारितोषिक जाहीर केले. (5 criminals arrested from Pune in danger of Ner peace due to old dispute dhule crime news)

अपर पोलिस अधीक्षक काळे यांनी बुधवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत सांगितले, की २ जूनला रात्री अकरानंतर नेर येथे एक स्थळ अपवित्र करणे व त्यातून एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावतील असे गैरकृत्य काही संशयितांनी केले.

अशा घटनेनंतर नेर येथे काही काळ तणावाचे वातावरण होते. परंतु, स्थानिक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पोलिस अधिकारी आदींनी घटनास्थळी समन्वयातून शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे नेरमधील सलोखा कायम टिकून राहिला.

पोलिसांनी घटनेच्या तपासाची गतीने चक्रे फिरविली. पोलिस अधीक्षक बारकुंड, श्री. काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकातील तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, उपनिरीक्षक अनिल महाजन, हवालदार प्रवीण पाटील, रवींद्र माळी, प्रमोद ईशी, मुकेश पवार, ज्ञानेश्‍वर गिरासे, अमोल बोरसे, विनायक खैरनार, विनोद गांगुर्डे, नितीन दिवसे, कांतिलाल शिरसाट, रवींद्र सोनवणे, राकेश मोरे, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, प्रमोद पाटील आदींनी पुण्यात लपून बसलेल्या संशयितांचा माग काढला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पथकाने पुणे एमआयडीसीतून गणेश छोटू शिरसाट (वय २२) याला ताब्यात घेतले. त्याने भीमराव सुकलाल कुवर (३६), विकी नाना कोळी (३१), रोहित अरुण जगदाळे (२१) आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने कट रचून गुन्हा केल्याची कबुली दिली. यात नेरमधील नदीलगत झुडपातून भीमराव कुवर याने एक प्राणी मारला. नंतर तो गोणीत टाकून एका किराणा दुकानाच्या गच्चीवरून एका स्थळी फेकले.

त्यानुसार पोलिसांनी संशयित पाच जणांना ताब्यात घेत पुढील योग्य ती कार्यवाही केल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. संशयितांबाबत कुठलीही माहिती नसताना शास्त्रोक्त तंत्र आणि कौशल्यबळावर गुन्हा उघडकीस आणल्याने पोलिस निरीक्षक शिंदे व पथकाची वरिष्ठांनी प्रशंसा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT