Nandurbar News : शिक्षण मंडळांतर्गत पालिकेच्या पाच शाळांना एचडीएफसी बँकेकडून सीएसआर फंडातून ४० लाखांची डिजिटल क्लासरूमसाठी मदत मिळाली.
या कामासाठी पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, तसेच लेखाधिकारी वर्ग एक वैशाली जगताप आणि शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांच्या प्रयत्नातून पालिकेच्या १६ पैकी शाळा क्रमांक २, ७, १०, १२ व शाळा क्रमांक २० तथा लोकमान्य टिळक विद्यालय, नंदुरबार या शाळेतील प्रत्येकी एका वर्गखोलीमध्ये डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आला आहे.(5 schools of Nandurbar Municipality Digital 40 lakhs assistance from HDFC Bank through CSR Fund Nandurbar News)
प्रत्येक शाळेला आठ लाख रुपये याप्रमाणे ४० लाखांचे डिजिटल व्हर्च्युअल क्लासरूम, रंगरंगोटी, ६५ इंची डिजिटल टीव्ही प्रोजेक्टर, प्रत्येक शाळेला दहा-दहा बेंचेस, कार्पेट देण्यात आले. डिजिटल वर्गामुळे या शैक्षणिक वर्षापासून पटसंख्येत वाढ होत आहे. मुलांना आनंददायी शिक्षण दिले जाते, त्यामुळे मुलांची उपस्थिती पालिकेच्या शाळेत भरभराटीची दिसत आहे.
शाळा क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका नाझिमा परवीन शेख जाहिरोउद्दीन, शाळा क्रमांक ७ चे मुख्याध्यापक सचिन आव्हाड, शाळा क्रमांक १० चे मुख्याध्यापक वासुदेव राजभोज, शाळा क्रमांक १२ चे मुख्याध्यापक करणसिंग चव्हाण आणि शाळा क्रमांक २० च्या मुख्याध्यापिका उषा गावित व लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रीतम परदेशी व सर्व शाळांच्या कर्मचारी अतिशय मेहनत घेऊन डिजिटल शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
गोरगरिबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात सातत्याने टिकून राहावीत यासाठी मुख्याधिकारी अमोल बागूल, लेखाधिकारी वैशाली जगताप आणि प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांनी पालिकेच्या शाळेसाठी शर्तीचे प्रयत्न करून पालिकेच्या शाळांना ४० लाखांचे साहित्य उपलब्ध करून दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.