crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धुमश्चक्रीत 6 जखमी; पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या 41 जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : देवपूरमधील भिवसननगरात बुधवारी (ता. १८) रात्री पूर्ववैमनस्यातून दोन गट समोरासमोर भिडले. त्यात चाकू, हॉकीस्टिक व लाकडी दांडक्यांचा वापर झाला. हाणामारीत सहा जण जखमी झाले.

या प्रकरणी गुरुवारी (ता. १९) परस्परविरोधी तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तब्बल ४१ जणांवर गुन्हा दाखल झाला.(6 injured in clashes between 2 group dhule crime news)

मनीषा चौधरी (रा. भिवसननगर) यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा मुलगा दर्शन परिसरातील मंदिराजवळ बसलेला असताना त्याच्याजवळ चेतन बागूल व मयुरेश बागूल आले. दोघांनी दर्शनला मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर दर्शन घरी आला.

त्याने घडलेला प्रकार सांगितल्यावर मनीषा चौधरी यांच्यासह त्यांचे पती सजन चौधरी व काही जण जाब विचारण्यासाठी श्री. बागूल यांच्या घरी गेले. याचा राग येऊन किरण श्रीराम बागूल, विकास श्रीराम बागूल, नरेंद्र चौधरी, चेतन किरण बागूल, प्रथमेश विकास बागूल, मीनाक्षी किरण बागूल, मयुरेश बागूल, बापू चौधरी, स्वप्नील बागूल, सुभाष बागूल, दीपक भीमराव पाटील यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. काठी, चाकू व हॉकीस्टिकने मारहाण केली.

मनीषा चौधरी, त्यांचे पती सजन चौधरी, मुलगा दर्शन तिघे जखमी झाले. त्यानंतर कॉलनीतील लोकांनी भांडण सोडवल्याने चौधरी कुटुंबीय तसेच अन्य जण घरी परतले. त्यानंतर पुन्हा ११ जणांनी त्यांच्या घराजवळ येऊन दगडफेक केली.

यात मनीषा चौधरी यांच्यासह इतर जणांना मार लागला. सर्व जण घरात पळाल्यावर उपरोक्त संशयितांनी घराच्या कंपाउंडमध्ये घुसून कुंड्यांचे नुकसान केले. पोलिस आल्याने संशयित पसार झाले. त्यावरून अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला.

परस्परविरोधी फिर्यादीत किरण श्रीराम बागूल (रा. भिवसननगर) यांनी म्हटले आहे, की बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते घरी असताना मागील भांडणाची कुरापत काढून सजन चौधरी, नटराज चौधरी, प्रसाद चौधरी, दर्शन सजन चौधरी, निखिल सोनार, मनीषा चौधरी व अन्य २० ते २५ जणांनी लाकडी दांडके, विटा घेऊन घरावर दगडफेक केली. त्यात उज्ज्वला बागूल, लता चौधरी जखमी झाले.

तसेच काठीने मारहाण केल्याने नरेंद्र चौधरी, स्वप्नील चौधरी हे दोघे जखमी झाले. किरण बागूल यांच्या घरात घुसून त्यांसह कुटुंबीयांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात श्री. बागूल यांच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट व रोहिणी चौधरी यांच्या गळ्यातील मंगलपोत तुटून गहाळ झाली. या प्रकरणी उपरोक्त ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT