Dhule News : येथील एमआयडीसीतील नामांकित डिसान अॅग्रो टेक कंपनीची तब्बल ५५ ते ६० लाखांत फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी कंपनीतील तीन संशयितांवर मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (60 lakh fraud of Deesan Agro Tech dhule crime news)
कंपनीचे कर्मचारी अशोक मुकुंदा सोनार (वय ५२, रा. शिरपूर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अवधान येथील डिसान अॅग्रो टेक प्रा. लि कंपनीतील इलेक्ट्रिक वजनकाट्यावरील ऑपरेटर अमित संजय कासार (रा. वाखारकरनगर, धुळे), विकास भटू पानगे (रा. मोहाडी) व प्रमोद दिलीप सोनवणे (रा. सौंदाणे, ता. धुळे) यांनी संगनमत केले.
त्यातून १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कंपनीत डीओसी पेंड माल खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांमध्ये तो ऑर्डरप्रमाणे भरून दिल्यानंतर वाहनाचा वजनकाटा कंपनीच्या बाहेर सोडून कंपनीच्या गेटवरील सिक्युरिटी गार्डमार्फत वाहन पुन्हा कंपनीत आणले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामध्ये वेळोवेळी एक ते दोन टन वजनाचा डीओसी पेंड माल प्रतिटन ५० हजार रुपयांप्रमाणे अधिक भरून त्या मोबदल्यात संबंधितांकडून मिळणारी रक्कम आपापसात वाटून घेतली.
स्वतःच्या फायद्यासाठी मालाची चोरी करीत विश्वासघात केला. कंपनीच्या परवानगीशिवाय सरासरी ५५ ते ६० लाख किमतीचा डीओसी पेंड माल वाहनांमध्ये अधिक भरून कंपनीची फसवणूक केली. त्यामुळे पोलिसांनी संशयित अमित कासार व विकास पानगे याला अटक केली आहे. मोहाडीचे सहाय्यक पोलिस अधिकारी भूषण कोते तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.