Dhule News : जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात सिंचन विहिरी व शेततळ्यांना मान्यता देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार सिंचन विहिरींचे सात हजार ३४१ प्रस्ताव मंजूर केले आहेत.
त्यापैकी ४०० विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. यात साक्री तालुका आघाडीवर आहे.(7 thousand proposal for irrigation wells approved dhule news)
उर्वरित धुळे, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यांतील प्रस्ताव छाननी व पडताळणीच्या प्रक्रियेत रखडले आहेत. दरम्यान, सिंचन विहिरींच्या कामांना युद्धपातळीवर गती द्यावी असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी यंत्रणेला दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींमधून दहा हजार ६०५ प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल झाले. छाननीअंती सात हजार ३४१ प्रस्ताव पात्र ठरले. त्यापैकी दोन हजार ६०२ प्रस्तावांची वर्क कोड जनरेट झाली.
तसेच दोन हजार १८६ विहिरींना तांत्रिक, एक हजार ७३७ विहिरींना प्रशासकीय आणि एक हजार २७० सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी ४०० विहिरींचे प्रत्यक्ष सुरू झाले आहे. विहिरींच्या कामात साक्री तालुका आघाडीवर आहे.
धुळे, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यांत कामांना पाहिजे तशी गती मिळालेली नाही. या तालुक्यांत कार्यारंभ आदेश रखडले आहेत. यासंदर्भातील सीईओ श्री. गुप्ता यांनी आढावा घेतला. त्यांनी कामांना युद्धपातळीवर गती देण्याचे आदेश यंत्रणेला दिले.
शेततळ्यांची स्थिती
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात शेततळ्यांसाठी प्राप्त २६१ प्रस्तावांपैकी २३८ प्रस्ताव पात्र ठरले. त्यांचे वर्ककोड जनरेट करण्यात आले. २२५ प्रस्तावांना तांत्रिक तर २१४ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. २०४ शेततळ्यांची कामे सुरू झाली. १०३ कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.
तालुकानिहाय स्थिती अशी
साक्री तालुक्यात तीन हजार ३४६ सिंचन विहिरींचे प्रस्ताव पात्र आहेत. एक हजार ९८५ वर्ककोड जनरेट झाले. शिवाय, एक हजार २७० विहिरींना कार्यारंभ आदेश दिले आहेत. धुळे तालुक्यातील सिंचन विहिरींच्या ५३५ पात्र प्रस्तावांपैकी ४९३ प्रस्तावांचे वर्ककोड जनरेट झाले.
त्यांना तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे. शिरपूर तालुक्यात ६८१ प्रस्ताव पात्र आहेत. १२४ वर्ककोड जनरेट झाले. १२३ प्रस्तावांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तर शिंदखेडा तालुक्यात दोन हजार ७७९ पात्र प्रस्ताव आहेत. त्यांची वर्ककोड, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मात्र रखडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.