milk Adulteration milk prices
उत्तर महाराष्ट्र

Dhule Milk Adulteration : साक्रीत दूध भेसळ रोखली; तीन विक्रेत्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Milk Adulteration : भेसळयुक्त दूध रोखण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या पथकाने साक्री शहरात पाच विक्रेत्यांची तपासणी केली.

त्यात तीन विक्रेत्यांकडील दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास व चव, मृत कीटक, अस्वच्छता आढळली. त्यामुळे गाय, म्हशीचे शंभरपैकी ७० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. (70 liters of adulterated milk was destroyed in sakri dhule news)

नवापूर रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलसमोर फेरीवाल्यांच्या दुधाची तपासणी झाली. यात अन्न व औषध प्रशासनाने शंभू शंकर डेअरी येथे खाद्यपदार्थ विक्री परवाना नसल्याने घाऊक पुरवठादार तसेच किरकोळ विक्री करणाऱ्या अस्थापनेवर विनापरवाना विक्री व पुरवठ्याच्या कारणाखाली खटला नोंदविला. श्रीगणेश डेअरीची तपासणी केली.

तसेच एक विक्रेता पसार झाला. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, सहाय्यक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी विजय गरुड, विस्तार संकलक प्रीतेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, दूध तपासणी तंत्रज्ञ मनोज पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुधात भेसळ करणे व भेसळ नियंत्रण मोहिमेस मज्जाव करणे हा गुन्हा आहे. तसेच दूध पुरवठादार व दूध विक्रेत्यांनी पाणी किंवा कुठल्याही प्रकारची भेसळ न करता स्वच्छ दूध हाताळणी व स्वच्छ कार्यपद्धतींचा अवलंब करावा.

विनाभेसळ दूध वितरण करावे. दुधात कुठल्याही प्रकारची भेसळ न करण्याचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हास्तरीय समितीने दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT