Dhule Gram Panchayat : धुळे तालुक्यातील महसुली १६० गावांमधील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी आठ कोटीवर पोचली आहे. आतापर्यंत घर आणि पाणीपट्टीची केवळ पंचवीस टक्के वसुली झाली आहे.
वसुलीच होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहे.(8 Crore house with water dues of villagers dhule gram panchayat news)
थकबाकीमुळे ग्रामविकासाला खीळ बसली आहे. दुष्काळामुळे वसुलीस अडचणी येत असून ग्रामपंचायती हतबल ठरत आहेत. धुळे तालुक्यात एकशे साठ महसुली गावे आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायती १३० वर आहे. उर्वरित गावे गट ग्रामपंचायतीत आहेत. ग्रामविकासासाठी घर आणि पाणीपट्टी वसुली महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात.
गेल्या वीस वर्षांपासून वसुलीचे प्रमाण पंचवीस टक्क्याच्या आत आले आहे. वसुलीसाठी सरपंच व सदस्यच सहकार्य करीत नसल्याने थकबाकीचा आकडा फुगला असल्याचे चित्र सर्वत्र आहे. वसुलीसाठी अद्यापही मोठे प्रयत्न होत नसल्याने नियमित कर करणाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
वसुलीसाठी शिबिरे लावण्याची गरज
तालुक्यातील पंचायतीवर थकबाकी आठ कोटींवर आहे. वसुलीसाठी ठोस प्रयत्न नाहीत. पंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी वसुलीसाठी कॅम्प लावणे आवश्यक आहे. वसुली नियमित न करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र तसे नियोजनच नसल्याने थकबाकीचा आकडा फुगत आहे.
दुष्काळामुळे ‘नो वसुली’
यावर्षी तालुका दुष्काळग्रस्त आहे. खरीप हंगामातून कर्जबाजारीपण आले. याचा थेट परिणाम हा कर वसुलीवर होत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे तीन महिने शिल्लक आहेत. तीन महिने शिल्लक असताना देखील वसुली वीस टक्के देखील झालेली नाही. त्यामुळे नवीन वर्षात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रश्न उद्भवणार आहे.
धुळे तालुक्यातील घरपट्टीची थकबाकी
वर्ष थकबाकी
२०२२-२३ : १ कोटी ४८ लाख १९ हजार ८१०
२०२३-२४ मागणी : ४ कोटी ९२ लाख ९४ हजार ६५०
---------
धुळे तालुक्यातील पाणीपट्टीची थकबाकी
वर्ष थकबाकी
२०२२-२३ ५ कोटी ८० लाख ४ हजार ८९८
२०२३-२४ ची मागणी ३ कोटी १० लाख २५ हजार २७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.