Nashik News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार शहराच्या चहुबाजूचे रस्ते चकाकणार; 80 कोटींचा प्रकल्प

धनराज माळी

Nandurbar News : पालिकेच्या निवडणुकांची मुदत संपूनही अद्याप निवडणुका जाहीर झाल्या नाहीत म्हणून मिळालेला अवधी ही एक नामी संधी असल्याचे साधून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्थानिक स्तरावरील राजकीय विरोधाची पर्वा न करता शिंदे-फडणवीस सरकारकडून ८० कोटींचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करून आणत शहरवासीयांसाठी निवडणुकीपूर्वीची भेट दिली आहे. (80 crore road development project approved by Shinde Fadnavis government nandurbar news)

पालिकेचा प्रशासकीय इमारतीच्या मोठ्या प्रकल्पानंतर रस्ते विकासासाठीचा हा निधी शहर विकासासाठीचा मोठा हातोडा मारल्यागत आहे. स्थानिक राजकारणात रघुवंशी यांनी आणलेला हा निधी चर्चेचा विषय ठरला आहे. नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्यासह नगरसेवकांचा कार्यकाळ संपून तीन महिने होत आले.

आता प्रशासक काम पाहत आहे. असे असतानाही सौ. रघुवंशी यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका क्षेत्रातील शहराच्या चारही बाजूला असलेल्या वसाहतींचे रस्ते विकासासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत ९९ कोटींचा १५ रस्त्यांच्या विकासासाठी प्रकल्प शासनाकडे सादर केला होता.

निवडणुका लांबल्याचा लाभ

दरम्यान, रस्ते विकास प्रकल्प सादर करण्यासाठी पालिकेचा निवडणुका लांबल्याने तो कालावधी रघुवंशी यांचा पथ्यावर पडला. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होत नाही, आचारसंहिता लागत नाही, तोपर्यंत शहराच्या विकासासाठी प्रशासक काळातही काही विकास प्रकल्प आणता येतील का, या विचारांनी गुरफटलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ९९ कोटींचा १५ रस्त्यांसाठीचा प्रकल्प शासनाकडे सादर केला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

स्थानिकस्तरावर चंद्रकांत रघुवंशी व भाजप यांच्यात राजकीय संघर्ष आहे. या संघर्षातून यापूर्वीच्या रस्ते विकासासाठीच्या निधीबाबत तक्रार भाजपकडून झाली होती. त्यामुळे अद्यापही चार रस्त्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. असे असताना पुन्हा शहरातील रस्त्यांसाठी नवीन प्रकल्प सादर करून शासनाकडून निधी खेचून आणणे जिकिरीचे होते. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे.

कदाचित भाजपकडून निधी मंजुरीसाठी अडथळा निर्माण होऊ शकला असता. मात्र तो विचार न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी श्री. रघुवंशी यांच्या असलेल्या संबंधाचा फायदा घेत मुंबईवारी करीत मार्चअखेर ९९ पैकी तीन रस्ते वगळता उर्वरित १३ रस्त्यांसाठी ८० कोटींचा निधी मंजूर करून घेत तसे पत्र पदरी पाडून घेतले. त्यासाठी पालिका निवडणुका पुढे सरकलेल्या वेळेची संधी साधून श्री. रघुवंशी यांनी हा हातोडा मारत मोठा निधी शहरातील विकासासाठी आणला.

याचे श्रेय नक्कीच त्यांना जाते. त्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मेहरनजरच म्हणावी लागेल. त्यासाठी त्यांनी यापूर्वीही जाहीरपणे शिंदे-फडणवीस सरकारचे आभारही व्यक्त केले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून रस्ते विकास प्रकल्प मंजूर करणे म्हणजे शहरवासीयांसाठी निवडणुकीपूर्वीची मोठी भेटच म्हणावी लागेल. नंदुरबार शहरासाठी श्री. रघुवंशी यांच्या माध्यमातून मिळालेला निधी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

असा आहे प्रकल्प

-नंदुरबार पालिका हद्दीतील शहराच्या चहुबाजूच्या १३ रस्त्यांचा समावेश.

-१३ रस्त्यांसाठी ८० कोटींचा निधी नगरोत्थान योजनेतून मंजूर.

-पालिकेतर्फे सादर केला होता १५ रस्त्यांसाठी ९९ कोटींचा प्रकल्प.

-या प्रकल्पामुळे श्री. रघुवंशी यांना राजकीय बळ मिळणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT