Aaple Sarkar Portal News sakal
उत्तर महाराष्ट्र

Aaple Sarkar Portal : प्रमाणपत्र सेवांसाठी जास्त शुल्क घेतल्यास कारवाई; प्रशासनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Aaple Sarkar Portal : प्रमाणपत्र व इतर सर्व शासकीय सेवांबाबत शासनाद्वारे निश्‍चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराची आकारणी करणाऱ्या, शासन नियमांचे पालन न करणाऱ्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकाविरुद्ध कारवाई केली जाईल, केंद्रदेखील रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रमाणपत्र व शासकीय सेवांबाबतचे शासकीय दरफलक दर्शनी भागावर लावावे. तसेच शासकीय सेवांची यादी व सेवा देण्याचा कालावधीबाबतचा फलकही केंद्रांवर लावावा असे निर्देशही दिले आहेत. ( aaple sarkar portal Warning of action administration if overcharged for certificate services dhule news )

प्रतिज्ञापत्रासह जातीचे प्रमाणपत्राचा दर ५७.२० रुपये असून, उर्वरित सर्व शासकीय सेवांचा (प्रमाणपत्र) दर ३३.६० रुपये असल्याने यापेक्षा जास्तची आकारणी करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रचालकाविरुद्ध संबंधित तहसीलदारांकडे तक्रार दाखल करावी.

आधार नोंदणीकामी UIDAI यांच्याकडील Office Memorandum २० एप्रिल २०२३ द्वारे UIDAI मार्फत जाहीर केलेले दर असे ः नवीन आधार नोंदणी करणे- निःशुल्क, ५ ते ७ व १५ ते १७ वयोगटातील बालक यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे (अनिवार्य) उदा. हाताचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यांचे बायोमेट्रिक अपडेशन करणे- निःशुल्क,

७ ते १५ वयोगटातील बालक व १७ वर्षांवरील नागरिकांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे (अनिवार्य) उदा. हाताचे ठसे, डोळ्याचे बुबुळ यांचे बायोमेट्रिक अपडेशन करणे- १०० रुपये, इतर बायोमेट्रिक अपडेशन करणे (डेमोग्राफिकसह किंवा डेमोग्राफिकविना)- १०० रुपये, डेमोग्राफिक अपडेशन करणे (अपडेशन करताना एक किंवा जास्त बदल करणे).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऑनलाइन पोर्टलद्वारे किंवा ECMP/UPL/CELC या आधार नोंदणी केंद्राचा उपयोग करून- ५० रुपये, आधार केंद्राद्वारे POI (ओळखीचा पुरावा/Proof of Identity) व POA (पत्त्याचा पुरावा/Proof of Address) संबंधी कागदपत्र अपडेट करणे- ५० रुपये.

myaadhar या ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वत: ऑनलाइन POA/POI डॉक्युमेंट अपडेट करणे- २५ रुपये, eKYC वापरून आधार शोधणे, आधार संबंधी इतर कोणतेही साधन, ई-आधारकार्डचे कलर प्रिंट देणे ( A4 कागदावर )- ३० रुपये, UIDAI यांच्याकडील Office Memorandum ५ एप्रिल २०२३ नुसार नागरिकांच्या एकच पत्त्यावर आधार नोंदणी सेवा देणे.

(Home Enrolment Service) संबंधी प्रथम नोंदणी- ७०० रुपये व इतर सर्व नोंदणी- ३५० रुपये., PIN आधारित पत्ता प्रमाणीकरण पत्र (Aadhar Address Validation Letter)- ५० रुपये असे दर निश्‍चित आहेत.

या वरील शुल्काव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारणी केली किंवा उपरोक्त दरापेक्षा आधार केंद्रचालक जास्तीची आकारणी करत असल्यास अशा केंद्रचालकाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व संबंधित तहसीलदार किंवा १९४७ या टोलफ्री क्रमांकावर तक्रार करावी.

आधार अपडेट करा

आधारकार्ड नोंदवून दहा वर्षे पूर्ण झालेल्या आधारकार्डधारकांनी त्यांचे आधार कार्डाशी POI (ओळखीचा पुरावा/Proof of Identity) व POA (पत्त्याचा पुरावा/Proof of Address) दस्तऐवज अद्ययावत करणे आवश्यक आहे. आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार अद्ययावत करावे, असे आवाहन जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT