Inspirational News: दोंडाईचात ३९ वर्षांपासून गरजूंना मोफत घरपोच अन्नपुरवठा करणारे अब्बासभाई इब्राहिमभाई कलमूवाले दोंडाईचा येथील अँग्लो ऊर्दू हायस्कूलमध्ये शिपाई पदाची नोकरी सांभाळून हे काम करत होते.
नुकतेच ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतरही त्यांचे हे समाजकार्य त्याच पद्धतीने सुरू असून, त्यांच्या कार्याची दखल घेत सोहोनी परिवाराने त्यांना कार्यगौरव पुरस्काराने गौरविले. (Abbas Bhai Kalamuwale provides free food service to needy dhule news)
दोंडाईचा शहरातील अब्बासभाई एक परिचित सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व आहे. सर्वांकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे, ज्यांचा फोन आला तिथे जाऊन अब्बासभाई सायंकाळी शहरातील हॉटेल, लग्न समारंभ व अन्नदान अशा ठिकाणी जाऊन उरलेले अन्न, भाजी-पोळी, भात जे काही असेल ते टिफीनमध्ये घेऊन जे भेटले ते घेतात आणि पुन्हा दुसऱ्या हॉटेलवर मार्गस्थ होतात, त्याठिकाणी जे आहे ते घेतात अशाप्रकारे त्यांचे शहरात सायकलवर भ्रमण सुरू असते.
त्यांच्या सायकलवर टिफीन बांधलेले असतात. पूर्ण टिफीन भरले, की ते शहरातील गरीब वस्तीत जाऊन गरजूंना वाटप करतात. हा नित्यक्रम त्यांचा रोजचा असून, त्यांची गरीब व गरजू वाटच पाहत असतात.
अब्बासभाई नेहमी सायकलवर फिरत असतात. गेली ३९ वर्षे त्यांचा हा नित्यक्रम आहे. अब्बासभाई उरलेले अन्न गायींसह मुक्या प्राण्यांना खाऊ घालतात. त्यातूनही उरलेले अन्न न फेकता ते झाडाजवळ खड्डा खोदून पुरत असतात. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम न होता त्याचे खतात रूपांतर होत असल्याचे ते सांगतात. त्यांना गरीब जनता व मुलं व जनावरांविषयी प्रेम आहे.
अब्बासभाईंना त्यांच्या उपक्रमाबद्दल विचारले असता मी फक्त कर्म करत असतो. यापलीकडे त्यांच्याकडे उत्तर नसते. ते भाजी विक्रेत्यांकडून उरलेला भाजीपालाही गोळा करून त्याचे तुकडे करत मुक्या प्राण्यांना खाऊ घालत असतात. समाज प्रबोधन म्हणून शिळे अन्न खाऊ घालू नका. एखादी वस्तू आपल्याला आवडली नसल्यास ती कापून त्याचे तुकडे करून जनावरांना खाऊ घाला. त्यांना हात नाहीत मातीने ते घाण होते.
त्यांना तुकडे करून सन्मानाने खाऊ घालण्याचा सल्ला देत असतात. त्यांना प्रसिद्धी नको असून, ते प्रसिद्धीपासून दूर राहत फक्त कामाला महत्त्व देतात. मला मानव सेवा व वृक्षसेवा करण्याची आवड असून, काम हीच ईश्वरसेवा असल्याने हे काम करताना मला मनस्वी आनंद होत असल्याचे ते सांगतात.
पुरस्काराची रक्कम जनावरांसाठी
अब्बासभाईंच्या कार्याची दखल घेत सोहोनी परिवाराने त्यांना कार्यगौरव पुरस्काराने पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. त्यांना मिळालेली पुरस्क्राची रक्कम त्यांनी मुक्या जनावरांचे देशातील पहिले अनाथाश्रम चालविणाऱ्या श्रमसाफल्य पुरस्काराचे मानकरी गनराज जैन यांना कार्यक्रमातच देत एक आदर्श निर्माण केला वफक्त सन्मान स्वीकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.