Dhule News : सोमवारपासून कापूस खरेदी केंद्रावर पूर्ववत कापूस खरेदी सुरू होणार असून, शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले.
श्री. पाटील म्हणाले, की सीसीआयच्या अटी जाचक असल्याने सहसा शेतकरी सीसीआयला माल विकण्यास धजावत नाही; परंतु सीसीआयने रिजेक्ट केल्यावरच परवानाधारक व्यापारी बोली लावून खरेदी करतात. मात्र खरेदीचे प्रथम प्राधान्य सीसीआयलाच दिले जाते. (Abhijit Patil statement resumes cotton purchase from Monday in Shahada dhule news)
खरेदी केंद्रावर काही वाद उद्भवल्यास तत्काळ बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिवांमार्फत तो सोडविला जातो. शेतकरी बांधवांनी कुठल्याही प्रकारच्या संभ्रम मनात न ठेवता आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा निश्चितपणे आपला माल चांगला दर्जाच्या असल्यास अधिकाधिक दर मिळेल.
काही समज, गैरसमज असेल तर संचालक मंडळ किंवा बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करून घ्यावे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर मागील तीन दिवसांपूर्वी वाद झाला होता आणि हमीभावाप्रमाणे कापसाची खरेदी झाली पाहिजे या दोन विषयांवर मोठ्या प्रमाणावर संभ्रम होता.
या दोन्ही विषयांवर जिल्हाधिकारी व डीडीआर कार्यालयात निवेदने पोचली होती. या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी बाजार समितीतर्फे पत्रकार परिषद झाली. या वेळी सभापती अभिजित पाटील, उपसभापती डॉ. सुरेश नाईक, संचालक जगदीश पाटील उपस्थित होते.
या वेळी सभापती अभिजित पाटील म्हणाले, की शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद झाल्यानंतर तत्काळ जीनर्सला कारणे दाखवा नोटीस दिली. जोपर्यंत लेखी खुलासा येत नाही तोपर्यंत बाजार समितीच्या लिलावप्रक्रियेत संबंधित व्यापाऱ्याला सहभागी होता येणार नाही, अशी नोटीस दिलेली आहे.
हमीभावाचा विषय होता, त्याबाबत गेल्या दीड महिन्यापासून सीसीआयच्या माध्यमातून हमीभावाची खरेदी लिलाव केंद्रावर सुरू आहे. शेतकऱ्यांनी हमीभावाप्रमाणे आपला माल विकला आहे.
ज्या शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे माल विकायचा नसेल किंवा सीसीआयच्या अटी जाचक वाटत असतील असे शेतकरी जीनर्सकडे ओपन मार्केटमध्ये आपला माल विकत असतात. त्यांच्याकडूनही हमीभावापेक्षा कमी किमतीत विकला गेला तर शेतकऱ्यांकडून संमतिपत्र लिहिले जाते. जास्तीचा भाव असेल तर कुठल्याही प्रकारची अडवणूक शेतकऱ्याला होत नाही. शेतकरी बांधवांना आपला उत्पादित माल विकण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे.
आपला माल विकायचा की दुसरीकडे न्यायच्या त्याचेही स्वातंत्र्य शेतकऱ्याला आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, की कुठल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा. निश्चितपणे आपला माल चांगला दर्जाच्या असल्यास अधिकाधिक दर मिळेल. काही समज-गैरसमज असेल तर शेतकरी बांधवांनी संचालक मंडळ किंवा बाजार समितीचे सचिव यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करून घेण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
सर्वाधिक कापूस खरेदी
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर जीनर्सच्या माध्यमातून सर्वाधिक दीड लाख क्विंटलपर्यंत कापूस खरेदी झाली आहे. याउलट सीसीआयची कापूस खरेदी कमी आहे. सीसीआयच्या जाचक अटींमुळे शेतकरी सहसा माल देण्यास धजावत नाहीत. कापसाचा दर्जा पाहून जीनर्स हमीभावापेक्षा अधिक दरानेही खरेदी करत आहेत. बाजार समिती नेहमी शेतकरी बांधवांचा पाठीमागे भक्कमपणे उभी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.