naresh rana  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News : नवापूर येथे हॉटेलमालक नरेश राणा यांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Accident News : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गार्डनचे संचालक नरेश राणा हॉटेलहून घरी जात असताना १९ नोव्हेंबरच्या रात्री नऊच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

नातेवाइकांनी अपघात की घातपात, असादेखील संशय व्यक्त केला आहे.(Accidental death of hotels owner Naresh Rana in navapur nandurbar news)

नरेश गावित स्पोर्ट बाइक (जीजे ०५, एनटी ९१७९)वरून हॉटेलमधून घरी जात असताना महामार्गावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता, की डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व नातेवाइकांनी घटनास्थळी व रुग्णालयात मोठी गर्दी केली. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात रात्री शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

राणा यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, बहीण असा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे घरभरणीचा कार्यक्रम होता.

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने अनेक निष्पाप जणांचे बळी जात आहेत. या संदर्भात चौपदरीकरणाचे काम लवकर होणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT