Nardana revenue board officer Swati Vagh, Gorane revenue board officer Swati Koli, Akkadase Talathi Kavita Patil etc. while confiscating the trolley of tractor transporting illegal sand. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वाळूमाफियावर ‘महिला’ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कारवाई; वाळूमाफियांनी ट्रॅक्टर पळविला

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News :अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना बुधवारी (ता. ४) दुपारी दीडच्या सुमारास महिला मंडळ अधिकारी व महिला तलाठी यांना अक्कडसे गावशिवरात अवैध वाळू वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर उभी सापडली होती.(Action by female officer employees on sand mafia dhule news)

शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी शिंदखेडा तालुक्यात गौणखनिज मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याने भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवारी भरारी पथकातील महिला अधिकारी नरडाणा महसूल मंडळ अधिकारी स्वाती वाघ, गोराणे महसूल मंडळ अधिकारी स्वाती कोळी, अक्कडसे तलाठी कविता पाटील आदींनी अक्कडसे गावशिवारात गस्त घालत असताना अक्कडसेजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची टॉली नादुरुस्त असल्याची सापडली. त्यात दीड ब्रास वाळू भरलेली होती.

ट्रॅक्टरचा शोध घेतला असता ट्रॅक्टर व टॉली अक्कडसे येथील विशाल कोळी (मंबुईया)ची असल्याचे निष्पन्न झाले. ट्रॉली अक्कडसे येथील प्रभारी पोलिसपाटील भाऊसाहेब पाटील (रा. सोनेवाडी) यांच्या ताब्यात देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024: ‘इलेक्शन ड्यूटी’ नाकारल्यास जावू शकते नोकरी

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चा घोळ कायम; तुर्त ‘८५’ च्या फॉर्म्युल्यावर एकमत; अन्य ३३ जागांवर चर्चा

Priyanka Gandhi : वायनाड हे माझ्यासाठी कुटुंबच; काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Assembly Elections 2024: नेत्यांनो, शिव्यांचा वापर करू नका!

SCROLL FOR NEXT