New Education Policy esakal
उत्तर महाराष्ट्र

New Educational Policy : नवीन शैक्षणिक धोरणाची खरी अंमलबजावणी शिक्षकांपासूनच..

सकाळ वत्तसेवा

नंदुरबार : शिक्षण प्रत्येक घटकाशी संबंधित असले, तरी त्याचा प्रथम संबंध शिक्षकांशी येतो. भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाची (New Educational Policy) खरी अंमलबजावणी शिक्षकांपासूनच होणार असल्याने आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी व भारतीय शिक्षण मंडळ यांच्यातर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२०’ या विषयावर कार्यशाळा झाली. कार्यशाळेत शेकडो शिक्षकांनी उपस्थिती नोंदवत धोरण जाणून घेतले. (actual implementation of new education policy is from teachers nandurbar news)

पथराई येथील के. डी. गावित शैक्षणिक संकुलात कार्यशाळेत आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, भोसला मिलिटरी स्कूलचे पदाधिकारी सी. ए. प्रकाश पाठक, डॉ. विजय अवस्थी, भारतीय शिक्षण मंडळाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील, प्रवीण पाटील, के. डी. गावित फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विभूती गावित, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ऋषिका गावित, देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष पंकज पाठक, रूपेश देवरे, निखिल कुईटे आदी उपस्थित होते.

राष्ट्र उभारणीस सक्षम नेतृत्व घडवावे : पाठक

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षक पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार आहेत. हा शिक्षक माहिती देणारा, ज्ञानात भर टाकणारा आहे. त्यामुळे धोरण अंमलबजावणीत त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या जीवनात एक उंची निर्माण करावी, व्यक्तिमत्त्व विकसित करावे. ते व्यक्तिमत्त्व समाज, राष्ट्र एवढेच नव्हे तर विश्वासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणून शिक्षकांनी राष्ट्र रणीस सक्षम नेतृत्व घडवावे, असे मत नाशिकचे प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले.

डॉ. विजय अवस्थी यांनी शैक्षणिक धोरण खोलवर व मुद्देसूद पटवून दिले. याशिवाय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रवीण पाटील, पंकज पाठक, ऋषिका गावित, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. उमेश शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

जागतिक नेतृत्व विकसित करणारे धोरण : गावित

राजेंद्रकुमार गावित यांनी, नव्या धोरण शैक्षणिक समानतेचे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे व मानवाच्या विकासात मोठी भर टाकणारे असल्याचे म्हटले. पुढे या धोरणाच्या अंमलबजावणीतील प्रमुख घटक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्नेहाने जवळ घ्यावे, विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधत त्यांचा सर्वांगीण विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT