Adhik Maas 2023 : अधिक श्रावण मासारंभाला १८ जुलैपासून सुरवात होत आहे. दर तीन वर्षांतून एकदा अधिक मास येतो. या महिन्याला धार्मिक महत्त्व असते. अधिक मासामुळे या वर्षी गणरायाचे तब्बल १९ दिवस उशिराने आगमन होईल.
तथापि, १९ वर्षांनी श्रावण महिन्यात असा संयोग जुळून आल्याने विविध सण लांबणीवर पडतील. (adhik maas 2023 All festivals are delayed due to extra shravan month dhule news)
यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा आहे. त्यामुळे आठ श्रावणी सोमवार करण्याची संधी आहे. तीन वर्षांतून एकदा येणारा अधिक मास यंदा १८ जुलैपासून सुरू होत आहे. श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होईल. यंदा श्रावण महिन्यात अधिक मास आला आहे. अधिक मास सुरू होण्याआधीच १५ जुलैला श्रावण शिवरात्री संपेल.
अधिक मासाला १८ जुलैपासून प्रारंभ होऊन १६ ऑगस्टला सांगता होणार आहे. यापूर्वी असा योगायोग १९ वर्षांपूर्वी २००४ मध्ये जुळून आला होता. त्या वेळीही १८ जुलैपासून अधिक मासारंभ होऊन १६ ऑगस्टला संपला होता. हिंदू धर्मात दिवसांची गणना सौर आणि चंद्र महिन्याच्या आधारावर केली जाते.
चंद्र वर्ष ३५५ दिवसांचे, तर सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते. त्यामुळे एका वर्षातील चंद्र आणि सौर वर्षात १० दिवसांचा फरक असतो. यंदा श्रावण महिना जास्त दिवस असल्याने श्रावणाच्या दोन महिन्यांतील एक महिना अधिक मासाचा आहे. त्यामुळे या वेळी श्रावण सोमवार चारऐवजी आठ असतील. अधिक महिन्यामुळे सर्व सण लांबणीवर पडले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दर वर्षी रक्षाबंधन १० ते १५ ऑगस्टदरम्यान येते. या वर्षी ते ३१ ऑगस्टला आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दसरा आणि दिवाळीही १५ ते २० दिवस उशिरा असतील. गेल्या वर्षी ३१ ऑगस्टला श्री गणरायाचे आगमन झाले होते. यंदा ते १९ सप्टेंबरला होईल. २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. गणेशोत्सव उशिरा असल्याने भक्तांना बाप्पांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागेल.
श्रावण महिन्यात जुळला योग
ज्योतिषीय गणनेनुसार सौर वर्ष ३६५ दिवस, सहा तास आणि ११ सेकंदांचे असते. मात्र चांद्रवर्ष ३५४ दिवस आणि नऊ तासांचे असते. अशा स्थितीत दर वर्षी चांद्र वर्षात सौर वर्षापासून सुमारे ११ दिवसांचा फरक असतो.
सौर वर्ष आणि चांद्र वर्षाचा ताळमेळ राखण्यासाठी एका मलमासानंतर दुसरा मलमास ३२ महिने, १६ दिवसांनी पुन्हा येतो. अशा प्रकारे दर तिसऱ्या वर्षी अधिक मास होतो. असाच योगायोग तब्बल १९ वर्षांनंतर या वेळी श्रावण महिन्यात जुळून आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.