धुळे : खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)च्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विभागीय कार्यालय व कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीस नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. (Administrative approval for administrative building of Divisional Office of the Executive Engineer of MIDC dhule news)
२१ कोटी रुपये खर्चातून ही इमारत उभारण्यात येणार असल्याचे खानदेश चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत २८ ऑगस्ट २०२२ ला धुळ्यात आले होते. या भेटीदरम्यान खानदेश औद्योगिक विकास परिषद व खानदेश चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नितीन बंग, राजेश गिंदोडिया यांनी औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी विविध मागण्यांचे निवेदन मंत्री सामंत यांना दिले होते.
शहरातील औद्योगिक वसाहतीत भूखंड उपलब्ध नसल्याने नवीन जागेचे अधिग्रहण त्वरित मार्गी लावावे, सध्या औद्योगिक वसाहतीस उपलब्ध पाणीसाठा पुरेसा नसल्याने जवळ उपलब्ध पाणीसाठ्यातून पाणी मिळावे यासाठी नवीन जलवाहिनी योजनेस मंजुरी द्यावी, नरडाणा वसाहतीतील वन विभागाच्या अडचणींवर त्वरित मार्ग काढावा, सध्या रेस्ट हाउसमध्ये कार्यरत विभागीय कार्यालयासाठी नवीन इमारतीस त्वरित मंजुरी द्यावी आदी मागण्या केल्या होत्या.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
त्या वेळी मंत्री सामंत यांनी रेस्ट हाउसमध्ये कार्यरत कार्यालयाबद्दल आश्चर्य व्यक्त करून तीव्र नाराजी व्यक्त केली होती व प्रशासकीय इमारतीचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यकारी अभियंता एम. एस. पाटील, अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे यांनी कार्यालयीन पूर्तता तातडीने पूर्ण केल्याने चारमजली प्रशासकीय इमारतीस एमआयडीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
यामुळे आता लवकरच २१ कोटी रुपये खर्चाच्या भव्य इमारतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची कार्यालये स्थलांतरित होतील. दरम्यान, प्रशासकीय इमारतीचे काम मार्गी लावल्याबद्दल गुरुवारी (ता. २) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योगमित्रच्या बैठकीत मंत्री सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव श्री. बंग यांनी मांडला व तो बैठकीत मंजूर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.