धुळे : भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणानुसार महापौरपदाचा सोमवारी (ता. ९) रीतसर प्रशासनाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. सव्वा वर्षाच्या कारकीर्दीत कुणाचे मन दुखावले असेल, काही चुकले असेल तर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत भावनाविवश नगरसेवक प्रदीप कर्पे महापौरांच्या खुर्चीपुढे नतमस्तक झाले.
पक्ष प्रतिमा उजाळण्यासह सर्वांनाच सोबत घेऊन चालणारे, मितभाषीमुळे प्रत्येकाला आपलेसे वाटणारे श्री. कर्पे यांच्यासारखे महापौर होणे नाही, अशा शब्दांत त्यांचा उपस्थित मान्यवरांनी गौरव केला. (After mayor resignation emotional Karpe bowed before chair of mayor Dhule News)
महापौरपदाचा प्रशासनाकडे राजीनामा सादर केल्यावर श्री. कर्पे पत्रकार परिषदेद्वारे सामोरे गेले. ते म्हणाले, की पक्षासह धुळेकरांचे प्रेम, सर्व नेते, पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सर्वपक्षीय नगरसेवक, प्रशासन, प्रसारमाध्यमांच्या सहकार्याने सव्वा वर्षातील महापौरपदाच्या कारकीर्दीत विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पक्षाने दोनदा महापौर केले, आणखी काय हवे? त्यामुळे सर्वांचेच ऋणनिर्देश करीत आहे.
कारकीर्दीत मनोहर थिएटरजवळील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचा ठराव झाला. पदभार घेतला तेव्हा आरोग्याचा प्रश्न जटिल होता. त्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदार वॉटरग्रेस कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडले.
बोगस काम करणाऱ्या मलेरिया विभागाशी संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला. महापौरपदाद्वारे धुळेकरांना अधिकाधिक न्याय देणे, त्यासाठी वेळ देण्यावर भर राहिला. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त अक्कलपाडा योजनेचे सरासरी ८० ते ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यास विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी एक्स्प्रेस फीडरला मंजुरी मिळविली. बीओटी तत्त्वावरील निरनिराळ्या कामांना चालना दिली.
हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी जीएफआय मॅपेन आणले. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्वान निर्बीजीकरण, तसेच घन कचऱ्याशी निगडित बायोगॅस प्रकल्पाला मंजुरी दिली. मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली. त्यांच्या पदोन्नतीचे काम केले. केवळ १० टक्के दराने रक्त व लघवी तपासणीची सोय होण्यासाठी धुळेकरांसाठी पॅथॉलॉजी उपलब्ध करून दिली.
मॅग्नम कंपनीच्या माध्यमातून अल्पदरात अॅन्जिओग्राफीसह इतर तपासण्यांची सोय केली आहे. सोलर प्रकल्प उभारल्यास महापालिकेला वीज उपलब्ध होणार असून, सरासरी ३० ते ३५ टक्के वीजबिलात बचत होणार आहे. या प्रकल्पास मंजुरी दिली. महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी दवाखान्यासाठी ठराव केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मनपासाठी शंभर पदांच्या भरतीला मंजुरी मिळविता आली. कोट्यवधींच्या निधीतून रस्त्यांची कामे मार्गी लावता आली. निरनिराळ्या मागण्यांसाठी आलेल्या आंदोलक शिष्टमंडळांचे समाधान केले.
त्यांची कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले. ही संधी दिल्याने पक्षासह नेत्यांचे आभार मानतो, असे श्री. कर्पे यांनी नमूद केले. माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, अनिल नागमोते, हिरामण गवळी, भारती माळी, वंदना भामरे, बंटी मासुळे, माजी विरोधी पक्षनेता साबीर शेख, कमलेश देवरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.