Anil Patil, a progressive farmer, showing the bunch of bananas to be exported.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : शिरपूर पॅटर्नमुळे शेती झाली बागायती

शेतकऱ्याच्या आयुष्यात शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याने आशेचा नवा किरण दाखविला.

सचिन पाटील -सकाळ वृत्तसेवा

Dhule Agriculture News : भूजल पातळी खालावल्याने शेतीव्यवसाय त्यागावा की काय अशा विचारात असलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याने आशेचा नवा किरण दाखविला. पुन्हा जोमाने उभा राहिलेला बळीराजा शेतीउद्योगात गुंतला. कोरडवाहू जमिनीची बागायत झाली. केळीच्या बागा फुलल्या आणि बागेतली केळीची रास थेट परदेशात रवाना झाली.

अर्थे खुर्द (ता. शिरपूर) येथील माजी सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी अनिल मंगल पाटील यांच्या केळीच्या बागेतील ३२ टन केळी नुकतीच नेपाळमधील बाजारपेठेत रवाना झाली. केलेल्या परिश्रमांचे चीज झाल्याने अनिल पाटील भारावले. (Agriculture became horticulture due to Shirpur pattern dhule news)

पहिल्याच कापणीत ३२ टन केळी काढून व्यापारी दिनकर सपकाळे यांनी खरेदी केली. हा माल नेपाळच्या बाजारपेठेत रवाना करण्यात आला. अर्थे परिसरात श्री. पाटील यांची शेती आहे. पाण्याअभावी पिके घेण्यास मर्यादा येत होत्या. तरीही जिद्दीने ते शेतात नवनवीन प्रयोग करीत होते. मात्र पाण्याअभावी हळूहळू उमेदही नाहीशी होऊ लागली.

दरम्यान, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा व प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी अर्थे भागात जाऊन तेथील नाल्यांची पाहणी केली. तेथे बंधारे बांधण्याबाबत शिरपूर पॅटर्न टीमच्या तज्ज्ञांकडून सर्वेक्षण केले.

त्यांच्याकडून अनुकूल अभिप्राय मिळाल्यानंतर नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण सुरू झाले. रुंदीकरणासाठी नाल्याकाठच्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांचे मन वळविण्यात आले. काम पूर्ण होऊन नाले भरले आणि त्यांचे अडविलेले पाणी जमिनीत मुरले.

त्यामुळे परिसरातील विहिरींच्या भूजलपातळीत वाढ झाली. शेती सिंचनाखाली आल्याने शेतकऱ्यांचा हुरूप वाढला. त्यांनी पुन्हा कंबर कसून शेती करण्यास सुरवात केली. अनिल पाटील यांनी धोका पत्करून केळीची बाग करण्याचा निर्णय घेतला. एप्रिलमध्ये पाच एकर क्षेत्रात सात हजार केळीच्या रोपांची लागवड करण्यात आली.

बागेची निगा राखल्याने केळीची समाधानकारक रास पडली. त्यांची केळी पाहून व्यापारी सपकाळे यांनी खरेदीचा प्रस्ताव दिला. केळीची गुणवत्ता पाहून नेपाळला रवाना करावयाच्या फळांमध्ये श्री. पाटील यांच्या शेतातील केळीचा समावेश करण्यात आला. पाटील यांना आणखी १८ ते २० लाख रुपयांचे उत्पन्न केळीबागेतून अपेक्षित आहे.

"पटेल कुटुंबाच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांमुळे ही किमया घडली. पाणीपातळी वाढल्याने बागायती पीक घेण्याचा निर्णय घेतला. ऊतीसंवर्धित रोपलागवड, बागेचे व्यवस्थापन, योग्य कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर, सेंद्रिय खतांचा आवर्जून वापर केला. त्यामुळे निर्यातक्षम केळीचे उत्पादन शक्य झाले." -अनिल पाटील, प्रगतिशील शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT