PM Kisan Nidhi Yojana esakal
उत्तर महाराष्ट्र

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ जून २०२३ मध्ये जमा होणार आहे. (Agriculture Department appeals to farmers to e kyc dhule news)

केंद्र सरकारने या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (जोडणे) व ई-केवासी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही बाबी लाभार्थ्याने परिपूर्ण केल्याशिवाय त्यास पुढील हप्त्याचा लाभ अदा होणार नाही.

या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला वर्षातून तीन वेळा या योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षातून सहा हजार रुपये देण्यात येतात.

आगामी १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा केंद्रावर आधार हे बँक खात्याला संलग्न करून घ्यावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे पोस्टात कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे.

बँक खाते ४८ तासांत आपल्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा गावातील प्रत्येक पोस्टात उपलब्ध आहे. शिवाय पीएम किसान ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान जीओआय अॅप डाउनलोड करावे.

ज्यांच्याकडे जुने पीएम किसान अॅप असेल, त्यांनी त्याऐवजी पीएम किसान ॲप २.० हे अॅप्लिकेशन डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशनद्वारे स्वतःसह इतर ५० जणांचे ई-केवायसी करू शकणार आहेत. नंतरही योजनेचा १४ व्या हप्त्याचा लाभ घेण्यास अडचण आल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT