Dnyaneshwar Patil arrested in bribe crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe Crime : कृषी विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe Crime : विहिरीसाठी योजनेतून अनुदान मिळवून दिल्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून आठ हजार रुपयाची लाच स्वीकारताना येथील पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्‍याला गुरुवारी (ता.२२) धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ज्ञानेश्वर भगवान पाटील असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. (Agriculture extension officer arrested for accepting 8 thousand bribe dhule bribe crime news)

ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत लाभार्थी शेतकऱ्याला नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते.

त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पाहणी करून शेतकऱ्याला शिफारसपत्र देणे आवश्यक असते. वाकपाडा (ता.शिरपूर) येथील शेतकरी महिलेस विहीर मंजूर होऊन अनुदानाचा पहिला हप्तादेखील मिळाला.

उर्वरित काम पूर्ण करून महिलेचा मुलगा त्याचा खर्च जमा करून शिल्लक अनुदानाची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीमध्ये गेला. त्यावेळी संशयित डी. बी. पाटील यांनी ‘मी तुझ्या दुसऱ्या हप्त्याचे एक लाख ३१ हजार रुपयांचे काम केले, असून त्या मोबदल्यात मला दहा हजार रुपये दे, पैसे काढल्यावर मला भेटायला ये’ असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तक्रारदार शेतकऱ्याने २१ जूनला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेशी संपर्क साधून तक्रार केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर पथकाने सापळा रचला.

गुरुवारी शहरातील न्यायालयापुढे कन्या विद्यालयासमोर असलेल्या हॉटेलमध्ये शेतकऱ्याकडून डी. बी. पाटील यांनी लाचेच्या रकमेपैकी आठ हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंह चव्हाण, प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT