Farmers looking at submerged crops. 
उत्तर महाराष्ट्र

Tapi Flood News : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल! कपाशी नेस्तनाबूद

सकाळ वृत्तसेवा

Tapi Flood News : तापी नदीला महापूर आल्याने तेथील अतिरिक्त पाणी सोडल्याने अरुणावती नदीलाही पूर आला असून, नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतांमधील वेचणीवर आलेले कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हतनूर प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने तेथून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापीला महापूर आला आहे. (Agriculture on Arunavati banks under water due to flood in tapi river nandurbar news)

सुलवाडे प्रकल्पाचे सर्व २७ दरवाजे पूर्णत: उघडले असून, रविवारी (ता. १७) सकाळी तेथून आठ लाख २४ हजार ६०२ क्यूसेक विसर्ग झाला. तापी नदीतील अतिरिक्त पुराचे पाणी अरुणावती नदीत सोडल्याने ती दुथडी भरून वाहत आहे.

पाण्याचा लोंढा सातत्याने वाढल्यामुळे रविवारी सकाळी बाळदे (ता. शिरपूर) येथील पूल पाण्याखाली गेला. बाळदेसह जातोडा, बोरगाव परिसरातील नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरले. तेथील बहुतांश शेती पाण्याखाली आहे. या शेतांमध्ये प्रामुख्याने कपाशीची लागवड केली होती.

पावसाने ओढ दिल्यामुळे मिळेल तेथून पाणी आणून शेतकऱ्यांनी कपाशी कशीबशी जगविली. आता कापूस वेचणीसाठी मजुरांची जुळवाजुळव सुरू असताना पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या आशेवर अक्षरश: पाणी फिरविले. तापी काठावरील गिधाडे, वनावल, उपरपिंड, टेंभे येथील शेतांमध्येही पाणी शिरून कपाशी व केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतातील नुकसान पाहण्यासाठी शेतकरी शेताकडे निघाले, मात्र चिखल आणि पाण्यामुळे त्यांना शेतात पायही टाकता आला नाही. अखेर दुरूनच शेतात पाण्याखाली गेलेली पिके पाहताना त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने त्यांना भरीव मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त करण्यात आली.

"पावसाअभावी दुष्काळाची चाहूल लागल्यावरही हिंमत सोडली नव्हती. बाहेरून पाणी आणून कपाशीचे पीक जिवंत ठेवले. आता कापूस वेचणीची वेळ आली असताना एका रात्रीत शेतात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. ते कसे भरून निघेल या चिंतेने माझ्यासकट अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत." -ज्ञानेश्वर कुंभार, जातोडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT