Dhule: MLA Kunal Patil and others enjoying the Fugadi in Dindi which was taken out before the meeting. Former Minister Rohidas Patil at the launch of Ahirani Sahitya Dindi. esakal
उत्तर महाराष्ट्र

Ahirani Sammelan Dindi : धुळ्यात अवतरली खानदेशी संस्कृती; ‘जय अहिराणी, जय खानदेश’चा गजर!

जगन्नाथ पाटील

धुळे : शनिवार (ता. २१)पासून धुळे शहरात ‘जय अहिराणी, जय खानदेश’चा गजर सुरू झाला. अवघी धुळे नगरी या गजराने दुमदुमली आहे. खानदेशातील सण, उत्सव, परंपरांचे देखावे आणि पारंपरिक नृत्य करीत अवघे साहित्य पंढरीचे वारेकरी सहभागी झाले होते.

खानदेशासह दूरवर दूरस्थ प्रांतांत राहणारे अहिराणीवरील प्रेमीमंडळीही आवर्जून उपस्थित होते. शहराचे वातावरण अहिराणीमय झाले आहे. या साऱ्यास निमित्त होते आजपासून शहरात सुरू झालेले सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन. (ahirani sammelan dindi started at 6th All India Ahirani Literature Conference dhule news)

अहिराणी साहित्य संमेलनाची सुरवात महात्मा गांधी पुतळ्यापासून झालेल्या अहिराणीच्या पालखी व ग्रंथपूजनाने झाली. माजी मंत्री रोहिदास पाटील, लताताई पाटील, आमदार कुणाल पाटील, संमेलनाध्यक्ष रमेश बोरसे यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले.

खानदेशाची विविध संस्कृती दाखविणाऱ्या सण, उत्सवांचे सजीव देखावे मिरवणुकीत होते. धुळे शहरामध्ये आज संपूर्ण खानदेशी संस्कृती अवतरल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. दिंडी गांधी पुतळा, फुलवाला चौक, कराचीवाला खुंट, जमनालाल बजाज रोडमार्गे बारा फत्तर चौकाकडून साहित्यनगरीत पोचली.

दिंडीत सहभागी मान्यवर

दिंडीत माजी आमदार शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेनाप्रमुख अतुल सोनवणे, डॉ. सुशील महाजन, साहित्यिक कृष्णा पाटील, कवी जगदीश देवपूरकर, नृत्य दिग्दर्शक संतोष संकद, साहित्यिक रमेश सूर्यवंशी, रत्नाताई पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, अशोक सुडके, डॉ. दत्ता परदेशी, संतोष राजपूत, कृष्णा पाटील, रमेश सूर्यवंशी, कुणाल पवार, सोमदत्त मुंजवाडकर, रमेश उची, डॉ. अविनाश जोशी, निंबाजीराव बागूल, वृषाली खैरनार, शरद धनगर, रमेश धनगर, प्रवीण पवार, के. बी. लोहार, मोहन कवळीदकर, जितेंद्र बहारे, सारिका रंधे, डॉ. शकुंतला चव्हाण, गो. पी. लांडगे, नरेंद्र खैरनार आदी सहभागी झाले.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

कानबाई गीतांवर थिरकलीत साहित्यिकांची पावले

दिंडीमध्ये कानबाई, गौराई, भुलाबाई, डांख्या वाद्य, आदिवासी नृत्य, पोतराज, गोंधळी, व्हलर वाजा, लग्नाचे देवत, भजनी मंडळ आदी खानदेशी संस्कृतीचे दर्शन घडवणारे वैविध्यपूर्ण सजीव देखाव्यांनी धुळेकरांचे लक्ष वेधले. कानबाईचे गाणे, आदिवासी नृत्य व अहिराणी गाण्यांवर तरुणाईसह साहित्यिकांचीही पावले थिरकलीत.

कुणाल पाटलांकडून राजाश्रय

अहिराणी व खानदेशाची धुरा आमदार पाटील यांनी सांभाळली आहे. खानदेशाची संस्कृती आणि अहिराणी भाषेचा माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार पाटील यांनी नेहमीच अभिमान बाळगला आहे.

सलग तीन अहिराणी साहित्य संमेलन त्यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठबळाने सुरू आहेत. माजी मंत्री आणि आमदार पाटील या पितापुत्रांनी अहिराणीला राजाश्रय दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT