Nandurbar News : राज्याचा सर्वांगीण विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय आहे, आपल्याला ध्येयापासून बाजूला जायचे नाही. मी रोखठोक बोलतो, या स्वभवामुळेच जनता माझ्या पाठीशी राहते, काही थोडे फार घाबरतात. मात्र घाबरण्याचे काम नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडायचे नाही.
सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांचा पाऊलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादी आदिवासी, दलित, मागासवर्गीय, बहुजनांच्या विकासासाठी काम करत आहे. (Ajit Pawar statement Development of state is agenda of NCP nandurbar news)
महिलांना मान -सन्मान, आदर, सुरक्षितता मिळाली पाहिजे, सर्वांच्या विचाराने महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो आहे. राज्याचा विकास हाच पक्षाचा अजेंडा आहे, असे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. २) येथे केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी अमळनेर येथील साहित्य संमेलनासाठी आले होते. त्यानंतर नंदुरबार येथे सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित होते. दुपारी चारला त्यांचे आगमन झाल्यानंतर सायंकाळी सहाला कार्यकर्ता मेळाव्यात त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते रतन पाडवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, उपाध्यक्ष मोहन शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, प्रदेश सदस्य निखिल तुरखिया, ज्ञानेश्वर भामरे, किरण शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, रतन पाडवी, मधुकर पाटील, मोहन माळी आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील प्रश्न, कार्यकर्त्यांचा अडचणी यांसह आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धडगाव व तळोदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीची मागणीसह विविध विकासकामे मार्गी लावण्यासोबत जिल्ह्यातील पक्ष संघटनाची माहिती मांडली.
प्रदेश युवकध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही युवक काँग्रेसचे कार्य व त्या माध्यमातून पक्ष संघटनाची दिशा याबाबत रूपरेषा मांडली. श्री. पवार म्हणाले, की, अलीकडे आम्ही जी भूमिका घेतली, ती केवळ जनतेची कामे व्हावीत, यासाठीच घेतली. आदिवासी, दलित, बहुजन समाजाला एकत्रित आणून त्यांचा व राज्याचा विकास हेच ध्येय आहे.
त्यामुळे सत्तेत सहभागी होऊन सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. कालच्या अर्थ संकल्पात अर्थमंत्र्यंनी ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. शेतकरी, बेरोजगारांचा विकास, त्यांना रोजगार देण्याचे काम केले जाणार आहे.
आदिवासी विभागाचा अर्थसंकल्पात वाढ करण्याची मागणी केल्याने आपण पुरवणी मागण्यांत अडीच-तीन हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. तापीवर सुलवाडे, प्रकाशा सिंचन प्रकल्प उभारले, लिप्ट अडचणीत आल्या. उपसासिंचन असेल यासाठीही प्रयत्न केले.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की येत्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदींना विरोध करण्यासाठी सर्व महाआघाडी एकवटली. मात्र त्या फुग्यात पाणी गेले. मात्र तरीही गाफील राहू नका, पंतप्रधान मोदी हेच शेतकरी, गोरगरीब व युवकांचा विकास करू शकतात. त्यांचा नेतृत्वात आतापर्यंत जो विकास झाला तो कधीही झाला नव्हता.
त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा. तसेच जाती-जातीत फूट पडू देऊ नका, सर्वांनी एकत्रित राहून विकासाला साथ द्या, महिला, युवक, बेरोजगारांच्या विकासासह राज्याचा विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गावागावांत पक्ष पोचविण्यासाठी सर्वसामान्यांचे कामे करा, असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.