Member Naresh Chaudhary speaking in the standing committee meeting of the Municipal Corporation on Thursday.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : एप्रिलमध्येच टॅंकर, कुठे गेला तुमचा दावा? अक्कलपाडाच्या दाव्यांवर साशंकता

अधीक्षकावर शिस्तभंग

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेद्वारे धुळेकरांना कधी पाणी मिळेल, या प्रश्‍नावर अधिकाऱ्यांनी कामाची सद्यःस्थिती मांडतानाच नव्याने तारखांचा अंदाज व्यक्त केला. (Akkalpada water supply scheme Skepticism over water supply claims dhule news)

यादरम्यानच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाने आपल्या मोबाईलवर एका नागरिकाकडून आलेल्या मेसेजचे वाचन केले. ‘एप्रिलमध्येच टँकर मागवावा लागत आहे... कुठे गेले तुमचे एक दिवसाआड पाणी, एक महिन्यात पाणी देण्याचे आश्‍वासन... मते मागताना मुश्कील होईल... अशा आशयाचा तो मेसेज होता. एक महिन्याऐवजी दोन महिने घ्या पण ठोस आश्‍वासन द्या, अशी सदस्यांची भूमिका मनपा स्थायी समितीत उमटली.

दरम्यान, सार्वजनिक स्वच्छता विभागाच्या कार्यालयीन अधीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, त्यांच्याकडील पदांचा भार काढून घ्यावा, असा आदेश सभापतींनी दिला. महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. ६) सकाळी अकराला होती.

मात्र सभापतींसह सदस्य उशिरा आल्याने साधारण पाऊण तास सभा उशिराने सुरू झाली. सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तारीख पे तारीख सभेत सदस्य सुनील बैसाणे यांनी तापी पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटल्याचा संदर्भ घेत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या सद्यःस्थितीबाबत माहिती विचारली. त्यावर उपायुक्त विजय सनेर, कनिष्ठ अभियंता एन. के. बागूल, चंद्रकांत उगले यांनी तांत्रिक माहिती दिली व नव्याने योजनेचे ट्रायल व प्रत्यक्ष कार्यान्वयन याबाबत नव्याने काही तारखा मांडल्या.

अधिकाऱ्यांच्या दाव्यांचा हा संदर्भ घेत श्री. बैसाणे यांनी तारीख पे तारीख अशी स्थिती होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी दहा दिवसांऐवजी पंधरा दिवस सांगा, पण ठोस तारीख द्या. योजना पूर्ण झाल्यावर सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही सत्कार करणार असल्याचेही ते म्हणाले.

मोबाईल मेसेजचे वाचन

दरम्यान, याच चर्चेचा संदर्भ घेत सत्ताधारी सदस्य नरेश चौधरी यांनी आपल्या मोबाईलवर प्रभागातील एका नागरिकाने मेसेज केल्याचे म्हणत त्याचे वाचन केले. अधिकारी तारखा देतात, त्याच्या बातम्या येतात व नंतर याच बातम्यांचा संदर्भ देत नागरिक अधिकाऱ्यांना नव्हे तर आम्हाला जाब विचारतात, असे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेल्स आटतात त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होते. वलवा़डी भागातील पाण्याची समस्या न सुटल्यास आठ दिवसांनंतर आपण महापालिकेत ठिय्या आंदोलन करेन, असा इशाराही त्यांनी दिला.

एमजेपीची जबाबदारी

अक्कलपाडा योजनेसाठी पीएमसी म्हणून एमजेपी काम पाहत आहे. त्यासाठी एमजेपीला चार्जेसही द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या योजनेचे मुख्य काम एमजेपीचे आहे. त्यामुळे एमजेपीच्या अधिकाऱ्यांची या विषयावर बैठक घ्यावी, अशी सूचना अभियंता कैलास शिंदे यांनी केली. योजना पूर्णत्वासाठी अक्कलपाड्यालाच ऑफिस शिफ्ट करावे लागेल, असेही ते म्हणाले.

माईनकर यांच्यावर शिस्तभंग

दरम्यान, सभेच्या सुरवातीलाच सभापती श्रीमती कुलेवार यांनी सावरकर गौरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याबाबत स्वच्छता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माईनकर यांना रात्री नऊला फोन केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. रात्री अकराला पुन्हा फोन केला.

मात्र, स्मारक व परिसरात कोणत्याही प्रकारे स्वच्छता दिसून आली नाही. त्यामुळे श्री. माईनकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, त्यांच्याकडील भांडारपाल व कार्यालयीन अधीक्षकपदाचा कार्यभारही काढून घ्या, असा आदेश अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांना दिला. श्री. माईनकर सभेला अनुपस्थित होते.

स्मारकांचे विषय मंजूर

शहरातील मनोहर टॉकीजसमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे, कलामंदिर येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी चबुतरा बांधकामाचे विषय मंजूर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी ९९ लाख ९२ हजार ५४० रुपये, तर राजर्षी शाहू महाराज पुतळ्यासाठी चबुतरा बांधकामासाठी ८९ लाख ९९ हजार १९६ रुपये खर्च मंजूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT