Nandurbar News : डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी सोमवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले. शहरातील बागवान गल्लीत राहणाऱ्या व शहादा येथे माहेर असलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.
तीन महिन्यांपासून कुटुंब शासकीय यंत्रणांकडे न्यायाची मागणी करीत आहेत. शेवटी कुटुंबाने उपोषणाचे हत्यार उपसले. त्यामुळे त्यांना न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Alleging woman died due to wrong treatment by doctor family members went on one day fast in front of collector office nandurbar news)
तळोदा शहरातील बागवान गल्लीत राहणारे मोहसीन रफीक बागवान यांच्या पत्नीचा शहादा येथे रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. यात शहादा येथील डॉक्टरांनी चुकीच्या उपचार करून मृत्यूस कारणीभूत झाल्याचा आरोप मोहसीन बागवान यांनी केला होता. त्यात दोषी डॉक्टरांवर कारवाई व्हावी म्हणून ११ एप्रिल २०२३ ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. दुसरे निवेदन २० एप्रिललादेखील कुटुंबाने दिले होते.
दुसरीकडे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी २४ एप्रिल २०२३ ला जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना पत्र देऊन या प्रकरणी नियमोचित कार्यवाही करण्याची सूचना केली होती. कुटुंबाने पोलिस संरक्षण मिळण्याचादेखील अर्ज दिला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शासकीय यंत्रणांचे उंबरठे झिजवूनदेखील या प्रकरणी मोहसीन रफीक बागवान यांना न्याय मिळू शकलेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शेवटी मोहसीन रफीक बागवान व त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले आहे. या उपोषणात कुटुंबाने दोषी डॉक्टरांवर कारवाई होण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे यंत्रणा डॉक्टरांवर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मेरी अम्मी को इंसाफ दो
उपोषण स्थळी बालिकेच्या हाती ‘मेरी अम्मी को इंसाफ दो’चे बॅनर झळकले होते. ते बॅनर व मुलीचे वय पाहून येणाऱ्या-जाणाऱ्याचेदेखील मन हेलावत होते. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल काआ, असा प्रश्न विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.