Anaradbari (T.Shahada) Crowd of spectators gathered here on Friday.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News: अनरदबारी येथे ट्रक-स्कुटीच्या अपघातात अमळनेर तालुक्यातील तरुणी ठार; 2 जखमी

सकाळ वृत्तसेवा

कळंबू, : शहाद्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या स्कुटीवरील तरुणीचा तोल जाऊन ट्रकच्या चाकाखाली येत तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली, अशी माहिती सारंगखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

हर्षदा रवींद्र ठाकरे (वय १९, रा. वावडे, ता. अमळनेर) ही मावसभाऊ व मावसबहिणीला सोबत घेऊन दुचाकीने (एमएच १८ बीडब्ल्यू ०२७४) तोरणमाळवरून येत होती. (Amalner woman killed in truck scooter park at Anaradbari two dead )

अनरदबारीजवळील हॉटेल ओमियासमोर खराब रस्त्यामुळे तिचा तोल गेला. यात मागून येणाऱ्या ट्रक (एमएच ३४ बीजी ५८८५) या ट्रकच्या चाकाखाली आली. डोक्यावर चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

तिचा मावसभाऊ रोहित धनराज पाटील (वय २१) व मावसबहीण गायत्री धनराज पाटील (२०) हे जखमी झाले. ट्रकचालक गाडी जागेवर सोडून फरारी झाला. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे हे पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दल पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

जखमींना उपचारार्थ शहादा येथे हलविण्यात आले. हर्षदा ठाकरे हिचा मृतदेह शहादा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. मुलीचे नातेवाईक घटना पाहून सुन्न झाले.

सारंगखेडा ते शहादा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने खड्डा चुकविताना असे अनेक अपघात ही नित्याचीच बाब असल्याने नागरिकांनी संबंधित महामार्ग विभागाबद्दल घटनास्थळी तीव्र संताप व्यक्त केला.

विभाग अजून किती बळी घेण्याची वाट पाहत आहे, अशा भावना लोकांमधून घटनास्थळी उमटून येत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT