MLA Amarishbhai Patel asking questions to Deputy Superintendent of Land Records Department Govind Bhabad. Neighboring District Magistrate Pramod Bhamre. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कामे करा... नाही तर घरी जा...! अमरिशभाईंकडून तासभर अधिकाऱ्यांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सातवा वेतन आयोग लागू झाला ना... चांगला पगार घेता ना... तो कशाबद्दल मिळतो... लोकांची कामे करा नाही तर घरी जा... असे खडे बोल माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी मंगळवारी (ता. ५) येथील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुनावले. संतप्त आमदार पटेल यांनी तासभर या विभागाची झाडाझडती घेतली.

भूमिअभिलेख विभागाच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी हजर नसतात. नागरिकांची अनेक महिने कामे प्रलंबित ठेवली जातात. कर्मचाऱ्यांकडून दुरुत्तरे मिळतात, अशा तक्रारी काही पदाधिकाऱ्यांनी आमदार पटेल यांच्याकडे केल्या होत्या. (Amrishbhai patel ask question to officer in Land Records Office dhule news)

या पार्श्वभूमीवर आमदार पटेल सकाळी अकराला पोलिस ठाण्याशेजारील भूमिअभिलेख कार्यालयात पोचले. त्यांनी प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनाही बोलावून घेतले. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील उपस्थित होते.

कार्यालय बंद करायचे का?

भूमिअभिलेखचे उपअधीक्षक गोविंद भाबड यांना गैरहजेरीबाबत विचारणा केली. त्यांनी आपल्याकडे अतिरिक्त प्रभार असल्यामुळे आठवड्यातून दोनच दिवस शिरपूरला येत असल्याचे सांगितले. त्यावर तुमच्या कार्यालयाबाहेर हजर असलेले वार नमूद करून फलक लावावा, अशी सूचना आमदार पटेल यांनी केली.

तुम्ही नसाल तर मग कार्यालय बंद करायचे का, हाताखालचे कर्मचारी नेमून दिलेली कामे का पार पाडत नाहीत, नागरिकांना अनेकदा हेलपाटे कशासाठी मारावे लागतात, अशा प्रश्नांची सरबत्ती आमदार पटेल यांनी केली. त्यांना उत्तरे देताना श्री. भाबड यांची त्रेधा उडाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रात्रीस खेळ चाले

भूमिअभिलेख कार्यालयात दिवसा कोणी नसते; परंतु रात्री उशिरापर्यंत दिवे सुरू असतात. हा कोणता खेळ चालतो, अशी थेट विचारणा आमदार पटेल यांनी केली. प्लॉट, शेतजमिनी हडपण्याबाबत कुख्यात असलेले भूमाफिया या कार्यालयात ठिय्या देऊन का असतात, असा सडेतोड प्रश्नही त्यांनी विचारला.

दिवसभर जमीन मोजणीचे काम करून रात्री नकाशांच्या प्रिंट काढण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर श्री. भाबड यांनी दिले. तुम्ही दिवसाच कामे करा, रात्रीची जागरणे करू नका, त्यामुळे अपचन होते, अशा शब्दांत त्यांना आमदार पटेल यांनी समज दिली.

मी सासऱ्यांकडे राहतो...

कर्मचाऱ्यांना बोलावून घेतल्यानंतर मुख्यालयी कोण-कोण राहतो, अशी विचारणा आमदार पटेल यांनी केली. त्यावर बहुतांश कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणाहून ये- जा करीत असल्याचे समोर आले. एकाने मी काही दिवस अपडाउन करतो, तर काही दिवस सासऱ्यांकडे राहतो, अशी माहिती दिली. त्या वेळी उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

शिरपूरमध्ये स्थायिक होण्यासाठी लोक धडपडतात आणि तुम्ही अद्याप अपडाउनच करता, असे सांगून मुख्यालयी राहण्याचे निर्देश आमदार पटेल यांनी दिले. यापुढे लोकांनी तक्रारी केल्यास तुमच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मी पुढाकार घेईन, असा निर्वाणीचा इशारा आमदार पटेल यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT