नंदुरबार : डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हिकल मिशन २०२३ हा महत्वाकांक्षी प्रकल्प भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठीचे एक पाऊल आहे. २०२०-२१ मध्ये केलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम पे-लोड क्यूबज चॅलेंज' या प्रकल्पाचा पुढील टप्पा आहे
हा प्रकल्प हाऊस ऑफ कलाम येथील चालविल्या जाणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनकडून व स्पेस झोड इंडिया आरि मार्टिन ग्रुप यांचे द्वारा राबविला जात आहे. (APJ kalam satellite mission Child scientists from Nandurbar will make Pico satellites nandurbar news)
नंदुरबार जिल्ह्यातील वेली, कोठार व जळखे आश्रमशाळांतील प्रत्येकी २ विद्यार्थी, माध्यमिक विद्यालय खैरवे च्या २ विद्यार्थिनी, एकलव्य विद्यालय, के. आर. पब्लिक स्कूल व सार्वजनिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर चे प्रत्येकी १ आणि ओम श्रीराम कोचिंग क्लासेस, नंदुरबार चे ४ असे एकूण १६ बाल वैज्ञानिक सहभाग नोंदविणार असून यातून जागतिक विक्रम होणार आहे.
यामुळे तापी खोऱ्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या नामांकनात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हिकल मिशन २०२३ या प्रकल्पात विद्यार्थ्यांचे उपग्रह बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण झाले . तसेच प्रत्यक्ष पिको उपग्रह (लघु उपग्रह, ज्याचे वजन ७० ते १५० ग्रॅम) बनविण्यासाठी कार्यशाळा पुणे, परभणी आणि नागपूर येथे घेण्यात येत आहे.
या बालवैज्ञानिकांचा समावेश
शुक्रवारी (ता. २०) पुणे येथे झालेल्या कार्यशाळेत नंदुरबार जिल्ह्यातील अरविंद वळवी, विकास वळवी (वेली), दीपक वसावे, राकेश पावरा (कोठार), आयुष पाडवी, नैतिक पवार (जळखे), रोहिणी वसावे, योगिता पाडवी (खैरवे), श्रेयस चव्हाण (नवापूर), अथर्व वडनगरे, राज चितलांगे, प्रणव अहिरे, मिताली पाटील, मानसी काळे, प्रणाली लोहार व गायत्री पाटील (नंदुरबार) या १६ जणांनी उपग्रह बनविण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला.
रॉकेट बनविण्याची संधी
ऑनलाइन प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ऑल इंडिया स्तरावर एक परीक्षा सुद्धा होईल. या परीक्षेत प्रथम मेरीटमध्ये येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष वापरात येणारे रॉकेट बनविण्याची संधी मिळेल.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
या रॉकेटचे वजन २२.५ किग्रॅ असेल आणि उपग्रह त्यात फिट केल्यानंतर वजन ४५ ते ६० किलो ग्रॅम असेल. रॉकेट १९ फेब्रुवारी २०२३ ला तमिळनाडू मधील कांचीपुरम जवळील पट्टीपुर येथून अवकाशात सोडले जाईल. या रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळविण्यात आल्या आहेत.
रॉकेट उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर पॅराशूटचे साहाय्याने परत जमिनीवर लॅण्ड करेल आणि पुढील मिशनसाठी परत वापरता येईल. असा प्रयोग अमेरिकेत एलोन मस्क यांनी केला होता.
जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १५० पिको उपग्रहांसोबत असे रॉकेट हा पहिलाच प्रयोग असल्याने १९ फेब्रुवारी २०२३ ला हा भारतीय विद्यार्थ्यांचा जागतिक विक्रम, आशिया विक्रम, इंडिया विक्रम, आस्मित वर्ल्ड रेकॉर्ड असे विक्रम स्थापित होतील.
महाराष्ट्रात हा प्रकल्प मनीषा चौधरी (महाराष्ट्र राज्य समन्वयक) व मिलिंद चौधरी (जनरल सेक्रेटरी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन) यांचे नेतृत्वात होत असल्याची माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे फोलोवर आशिष वाणी यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.