Dr. Health Officer while guiding the employees in the Malaria Department meeting. M. R. Sheikh, District Winter Officer Dr. Anil Patil. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Dengue News : पावसाळ्यात 7 डेंगी पॉझिटिव्ह; ऑक्टोबरमध्येही दक्षता घेण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule Dengue News : यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांत धुळे शहरात सात डेंगी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दरम्यान, डेंगी डासांच्या उत्पत्तीसाठी धोकादायक महिन्यांपैकी ऑक्टोबर हा शेवटचा महिना आहे.

त्यामुळे या काळात डासांच्या नियंत्रणासाठी उपाययोजनेसह नागरिकांमध्ये जनजागृतीवर भर द्या, अशा सूचना मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. (appeal by municipality to take precautions for dengue dhule news)

धुळे महापालिका व जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे मलेरिया विभागाची महापालिकेत गुरुवारी (ता. ५) आढावा बैठक झाली. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. शेख म्हणाले, की जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत शहरांत एकूण ४७३ रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले.

त्यांपैकी १८ रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान, आता प्रत्येक कर्मचाऱ्याने कंटेनर सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी, धुरळणी आदी उपाययोजना सुरू ठेवायच्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळतील त्या संपूर्ण परिसरात मोहीम राबवून डास नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.

डास उत्पत्तीला पोषक काळ

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पाटील यांनी आगामी काळ प्रामुख्याने ऑक्टोबर हा महिनादेखील डासांच्या उत्पत्तीला पोषक ठरतो. कडक उन्हासह थंडी असे बदलते वातावरण असते. त्यामुळे डासांना पोषक वातावरण मिळते. या काळात एडिस इजिप्ती या डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उपत्ती जास्त होण्याची शक्यता असते.

त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. तसेच नागरिकांमध्येही माहितीपत्रकांद्वारे जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या. महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्या निर्देशानुसार बैठक घेण्यात आली.

मलेरिया पर्यवेक्षक विकास साळवे यांनी आभार मानले. बैठकीला सर्व आरोग्यसेवक, आरोग्य निरीक्षक, सुपर फील्डवर्कर उपस्थित होते.

चार महिन्यांतील डेंगी रुग्णांची स्थिती

महिना...संशयित पॉझिटिव्ह

जून...........६५......०२

जुलै..........८२......०२

ऑगस्ट......९८......०२

सप्टेंबर.....१०८......०१

एकूण........३५३....०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT