Dhule ZP News : जिल्हा परिषदेच्या १३ संवर्गातील ३४८ रिक्तपदांसाठी सुमारे नऊ हजार ३८९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
रिक्तपदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिल्यानंतर सात ऑक्टोबरपासून विविध पदांसाठी उमेदवारांची परीक्षा होत आहे. (Applications of 9 thousand candidates for ZP vacancies dhule news)
रिक्तपदे भरण्यासाठी १८ ते २६ डिसेंबरदरम्यान शहरातील संगणकीय परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा होणार असल्याची माहिती नोडल अधिकारी गट-क पदभरती तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिली. भरती प्रक्रियेसाठी शासनस्तरावरून मिळणाऱ्या निधीची अद्याप प्रतीक्षा आहे. प्रक्रियेत अडसर येऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पंधरा लाखांची तरतूद करून खर्च होणार आहे.
शुल्कातून ९८ लाख
जिल्हा परिषदेच्या १३ संवर्गात ३४८ रिक्तपदांसाठी उमेदवारांनी भरलेल्या परीक्षा शुल्काचे ९८ लाख रुपये जमा झाले आहेत. जिल्हा परिषद आणि जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांसाठी परीक्षा आयोजित केल्या जात आहेत.
अभियांत्रिकी सहाय्यकांच्या ४१ रिक्त जागांसाठी तीन हजार सहा, आरोग्य सेवकांच्या ५९ जागांसाठी दोन हजार ७४८, तर पर्यवेक्षिकांच्या रिक्त आठ जागांसाठी सर्वाधिक एक हजार ८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भरती प्रक्रियेसाठी शासनस्तरावरून अनुदान प्राप्त होणार होते. पण, अद्याप निधीची प्रतीक्षा आहे.
निधीची व्यवस्था
परीक्षेच्या कामकाजात निधीमुळे अडचण निर्माण होऊ नये म्हणून भरती प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून १५ लाखांची तरतूद केली आहे. सेस फंडाच्या निधीतून परीक्षा, जिल्हा निवड समिती सदस्य व सदस्य सचिवांचे मानधन, स्थळ अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांचे मानधन, परीक्षेला बसलेल्या दिव्यांगाच्या लेखनिकांचे मानधन, भरती कक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन तसेच अन्य साहित्य खरेदीचा खर्च भागविण्यात येणार आहे.
रिक्तपदे, कंसात दाखल अर्ज
आरोग्य पर्यवेक्षक : एक (९), आरोग्य सेवक : ५९ (२ हजार ७४८), परिचारिका : २०६ (८४६), औषध निर्माण अधिकारी : सात (७९१), कंत्राटी ग्रामसेवक : पाच (३८४), कनिष्ठ अभियंता : सहा (२५४), अभियंता यांत्रिकी : एक (९४), पर्यवेक्षिका : आठ (१ हजार ८१), पर्यवेक्षक : ११ (१२६), प्रयोगशाळा तंत्रज्ञ : तीन (१७६), अभियांत्रिकी सहाय्यक : ४१ (३ हजार ००६).
रिक्त पदांसाठी ऑनलाइन परीक्षा
जिल्हा परिषदेंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी १८ ते २६ डिसेंबरदरम्यान शहरातील संगणकीय परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा होणार असल्याची माहिती नोडल अधिकारी गट-क पदभरती तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिली.
रिक्तपदे भरती जाहीर प्रकटनानुसार १८ ते २० डिसेंबरला प्रत्येक दिवशी एक ते तीन सत्रांत कनिष्ठ सहायक पदाची परीक्षा होईल. २१ डिसेंबर व २६ डिसेंबरला दिवशी तीन सत्रांत औषध निर्माण अधिकारी पदाची तसेच २३ डिसेंबर व २४ डिसेंबरला तीन सत्रांत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाची परीक्षा होईल.
परीक्षेचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या https://dhulezp.mahapanchayat.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.