Standards for Ration Card esakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : अतिदुर्गम भागात नवीन 16 रेशन दुकानांना मंजुरी

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नंदुरबार जिल्ह्यात नवीन १६ स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी दिलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम, अति दुर्गम, वाड्या-वस्त्या पाड्यांवरील आदिवासी बांधवांना हक्काचं धान्य मिळावे यासाठी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्ह्यात नवीन १६ स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी दिलेली आहे.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील दुर्गम भागात गेले असतांना अनेक भागातील वाडे पाडे वस्त्यांमध्ये ग्रामस्थांनी हक्काचं धान्य मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली. रघुवंशी यांनी नवीन स्वस्त धान्य दुकानांसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून व प्रशासन स्तरावर वेळोवेळी निवेदन देऊन मागणी लावून धरली होती. मागणीची दखल घेऊन जिल्ह्यातील पहाडपट्टीत असलेल्या दुर्गम अतिदुर्गम भागातील त्याचप्रमाणे सरदार सरोवर प्रकल्पाने वेढलेल्या गावांच्या परिस्थितीचा विचार करून आदिवासी भागातील किमान ५०० लोकसंख्येची अटी शिथिल करून विशेष बाब म्हणून १६ नवीन स्वस्त धान्य दुकानांना शासन स्तरावरून मंजुरी देण्यात आलेली आहे.

मंजुरीचे पत्र नुकतेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना प्राप्त झाले आहे. स्वस्त धान्य दुकानांचे सर्व अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये हक्काचे रेशन मिळणार आहे.

नवीन १६ स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी मिळाल्याने स्थानिक स्वयंसहायता गट, सहकारी संस्था, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना दुकानांचे परवाने देण्यास प्राधान्य असेल. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्याचे सर्व अधिकार शासनाने वर्ग केले आहेत. १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत दुकान मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT