MLA jaykumar raval esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : राज्य सरकारतर्फे नंदुरबारला प्रकल्प; 40 हजार कोटींच्या प्रकल्पातून रोजगार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शिंदे-फडणवीस सरकारने नंदुरबारसह राज्यात ठिकठिकाणी ४० हजार कोटींच्या नव्या प्रकल्पांना मान्यता दिल्यामुळे रोजगाराच्या सव्वालाख संधी निर्माण होणार आहेत.

राज्याला आणखी प्रगतिपथावर नेणाऱ्या या निर्णयाबद्दल भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. (Approval of new projects worth 40 thousand crores at various places in state including Nandurbar news)

ते म्हणाले, की पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, नगर, रायगड, नवी मुंबई येथे प्रकल्पांच्या जागा निश्चित करत शब्दाला जागणारे शिंदे-फडणवीस सरकार असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. तत्कालीन ठाकरे सरकारप्रमाणे हे केवळ कागदावरचे करार नव्हेत, तर त्यांच्या जागादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत.

तेथील प्रकल्पांमुळे राज्याच्या भौगोलिक विकासाचा अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे. रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीचा २७०० कोटींचा प्रकल्प, नंदुरबार येथे जनरल पॉलिफिल्म्सचा ५०० कोटींचा प्रकल्प होणार आहे. विप्रो परी रोबोटिक्सचा ५४४ कोटींचा प्रकल्प सातारा येथे, तर ११० कोटींचा गणराज इस्पात प्रकल्प नगर येथे सुरू होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्य पुन्हा उद्योगस्नेही

महाविकास आघाडीच्या नावाने सत्ता हडप करून राज्याच्या सर्व क्षेत्रातील विकासाला खीळ घालण्याच्या ठाकरे सरकारच्या धोरणांमुळे राज्याची देशाच्या उद्योग क्षेत्रात पीछेहाट झाली. अनेक कारणांमुळे ठाकरे सरकारने कागदावर केलेले करार प्रत्यक्षात आलेच नाहीत.

उलट राज्यातील उद्योग क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण तयार केले. उद्योगांनी राज्याबाहेर जावे, असे राजकारण केले. शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्य पुन्हा उद्योगस्नेही होत असून, थेट विदेशी गुंतवणुकीत राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे, असेही आमदार रावल यांनी सांगितले.

राजधानी मुंबईच्या विकासात मानाचा तुरा रोवणाऱ्या वरळी-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू’, असे नाव, तसेच शिवडी-न्हावाशेवा सेतूला अटलबिहारी वाजपेयींचे नाव देऊन राज्य सरकारने थोर राष्ट्रपुरुषांचा गौरव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आमदार रावल यांनी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT