Lumpy News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lumpy Disease : ‘लम्पी’ केंद्रापासून 5 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र घोषित : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lumpy Disease : धुळे तालुक्यातील देवभाणे, सातरणे, न्याहळोद, विंचूर, सडगाव व साक्री तालुक्यातील अमोदे, वाघापूर, दिघावे येथील जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसिज या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे.

या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होऊ नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार संसर्ग क्षेत्रापासून पाच किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी दिला. ( area of ​​5 km from Lumpy center has been declared as affected area dhule news)

लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त गावांपासून दहा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. बाधित क्षेत्राच्या भोवताल परिघातील सर्व गावांतील फक्त गोवर्गीय जनावरांना गोट पॉक्स लशीची मात्रा देऊन १०० टक्के लसीकरण करण्यात यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

निरोगी जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत. गाय, म्हैसवर्गीय जनावरे एकत्र बांधत असल्यास त्यांना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करावी. त्वचेवर गाठी दर्शविणारी अथवा ताप असणारी जनावरे निरोगी गोठ्यात आणू नयेत. बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.

रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. गायी व म्हशींना पशुपालकांनी स्वतंत्र ठेवावे. बाधित परिसरात स्वच्छता ठेवून निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करावा व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादी कीटकांना नियंत्रणासाठी जंतुनाशकाची फवारणी करावी.

रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह आठ फूट खोल खड्ड्यात पुरून मृतदेहाच्या खाली-वर चुन्याची पावडर टाकावी. प्रादुर्भावग्रस्त गावात, संबंधित पशुवैद्यकीय प्रमुखांनी संपूर्णपणे परिसर नियंत्रणात येईपर्यंत नियमित भेटी द्याव्यात. भेट देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी इतरत्र रोगाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जनावरांच्या गोठ्यात औषधांची फवारणी करावी. लम्पी स्किन रोगाचा विषाणू वीर्यामधून प्रसार होत असल्यामुळे वीर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थांमार्फत होणारे वीर्यसंकलन थांबविण्यात यावे. वळूंची चाचणी करून रोगाकरिता नकारार्थी आलेल्या वळूंचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगाकरिता वापर करावा.

अडथळा आणल्यास गुन्हा

लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगर परिषदा, महापालिका यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात येऊन भटक्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे.

यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषदेने लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर करून प्रभावी नियोजन करावे. बाधित गावांमध्ये तसेच क्षेत्रभोवतालातील पाच किलोमीटर परिघातात गोट पॉक्स लशीचे लसीकरण करण्यात यावे.

उपरोक्त कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था, प्रतिनिधी यांच्याविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचेही श्री. गोयल यांनी आदेशात नमूद केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT