Ajit Pawar Vs Sharad Pawar : येथील राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेण्यावरून अजित पवार गट आणि शरद पवार गट समर्थकांमध्ये मंगळवारी (ता. ८) सायंकाळी राडा झाला. अजितदादा गटाच्या समर्थकांनी भवनाचे कुलूप तोडून ताबा घेतला. ते समजताच शरद पवार गटाचे समर्थक भवनात दाखल झाले.
त्यांनी आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. दोन्ही गटांत शाब्दीक चकमक झाली. पोलिस पथक दाखल झाल्यावर दोन्ही गटांचे कुलूप भवनाला लावण्याचा तोडगा निघाला आणि तूर्त वाद शमविण्यात आला. (Argue between supporters of Ajit Pawar group and Sharad Pawar group over taking over NCP Bhavan dhule ncp news )
मिल परिसरात २० वर्षांपासून शरद पवार चॅरिटेबल ट्रस्टचे राष्ट्रवादी भवन आहे. या परिसरातील खुला भूखंड भवनासाठी महापालिकेकडून मंजूर झाला. या ट्रस्टचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे अध्यक्ष होते.
ते भाजपमध्ये गेल्याने त्यांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मध्यंतरी भाजपला सोडचिठ्ठी देत माजी आमदार अनिल गोटे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यांना प्रदेश उपाध्यक्षपद दिले गेले. ते पक्षाचा कारभार राष्ट्रवादी भवनातून पाहू लागले. मात्र, पक्षाचे जुने पदाधिकारी व श्री. गोटे यांच्यात गटबाजी चालली. असे असताना श्री. गोटे यांनी मंगळवारी (ता. ८) भवनातून काही साहित्य वाहून नेत ताबा सोडला.
दोन गटांकडून राडा
हीच संधी साधत अजित पवार गटाचे युवा नेते सारांश भावसार, ज्येष्ठ किरण शिंदे असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी भवनात दाखल झाले. त्यांनी भवनाचे कुलूप तोडत ताबा घेतला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ते समजताच शरद पवार गटाचे शहराध्यक्ष रणजित भोसले, ज्येष्ठ जोसेफ मलबारी, जितेंद्र पाटील हे अनेक समर्थकांसह भवनास्थळी दाखल झाले.
त्यांच्यात राडा सुरू असताना शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगविली. दोन्ही गटांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जोपर्यंत योग्य तो निर्णय येत नाही, तोपर्यंत भवनाला दोन्ही गटांचे कुलूप लावावे आणि अंतिम निर्णयानंतर संबंधित गटाने ताबा घ्यावा, असा तोडगा काढण्यात आला.
अशात वीजपुरवठा खंडित झाल्याने दोन्ही गट घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, श्री. गोटे यांनी ‘पुनश्च एकदा हरी ओम’ अशा शीर्षकाखाली बुधवारी (ता. ९) पत्रकार परिषदेत भूमिका मांडणार असल्याचे प्रसारमाध्यमांना दिलेल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे.
भोसले आणि भावसार, शिंदेंची भूमिका
नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून २० वर्षांपासून भवनात बैठका, मेळावे होत आहेत. पक्षातील मधल्या सुटीच्या काळात अजित पवार गटाच्या समर्थकांनी बेकायदेशीरपणे कुलूप तोडले.
शरद पवार ट्रस्टचे भवन असल्याने कुणी ताबा घेण्याचा प्रश्न येत नाही, असे सांगत कायदा-सुव्यवस्था हाती घेणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. भोसले यांनी केली.
याउलट श्री. शिंदे, श्री. भावसार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी भवनाचा ताबा घेतला. भवनाच्या कुलपाची चावी मागितली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संतप्त अजितदादा समर्थकांनी कुलूप तोडून भवनात प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन अजितदादांच्या विचारांचे प्रतीक असल्याने त्यावर श्री. भावसार यांनी केलेला दावा योग्य आहे, अशी भूमिका जिल्हा सचिव हर्षवर्धन पवार, मंगल गुजर यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.