curfew esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी लागू

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम अन्वये २२ फेब्रुवारी रात्री बारापर्यंत शस्त्र व जमावबंदी (Prohibition) आदेश जारी केला आहे. (Arms and curfew orders were issued till midnight on February 22 under mumbai Police Act nandurbar news)

हा आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडेबाजार किंवा अंत्ययात्रेच्या जमावास लागू राहणार नाही. तसेच हा आदेश पोलिस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना, सभा अगर मिरवणुका काढण्यास रीतसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रेल्वे गेट ७४ वरील वाहतूक बंद

नंदुरबार : रेल्वेलाइन दुरुस्तीच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट क्रमांक ७४ कि.मी.११४/२८-३० या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक १० फेब्रुवारी २०२३ सकाळी आठपासून ते १४ फेब्रुवारी २०२३ रात्री आठपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

या कालावधीत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रेल्वे गेट क्रमांक ७३ कडून वळविण्यात येत आहे. उक्त मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने या कालावधीत काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‍भवणार नाही, यासाठी पोलिस विभागाने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून या मार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT