rohidas patil and kunal patil congress esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Congress News : भाजपवरची नाराजी ‘कॅच’ करणार? आगामी निवडणुकांत पाटील पिता-पुत्राने मोट बांधण्याची अपेक्षा

निखिल सूर्यवंशी

एकेकाळी धुळे व नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नंतर या पक्षाची काय वाताहत झाली हे सर्वश्रुत आहे. असे असताना धुळे जिल्ह्यात एकमेव धुळे ग्रामीणचा किल्ला माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे सुपत्र आमदार कुणाल पाटील यांनी ताब्यात ठेवला आहे.

हा किल्ला ताब्यात येण्यासाठी भाजपचा आटापिटा सुरू आहे. त्यातून अनेक आव्हानांना तोंड देत आमदार पाटील भक्कम पाय रोवून उभे आहेत. आगामी वर्ष निवडणुकांचे आहे. त्यात धुळे शहरातील भाजपवरची नाराजी पाटील पितापुत्र `कॅच` करून पक्षाला कशी नवसंजीवनी देतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

देशात लोकसभा निवडणूक आणि यासंदर्भात राजकारण, समाजकारणाची पहिली सुरवात सातपुड्यातील नंदुरबारपासून सुरू होत असे. ही परंपरा काँग्रेसने सुरू केली. यात आदिवासींच्या उत्थानासह पक्षीय विचारधारेची रूजवणी लोकसभा निवडणुकीतील पहिल्या प्रचार सभेतून नंदुरबार येथे होत असे. (article about dhule congress bjp politics news)

पुढे भाजपने ही प्रथा मोडीत काढत खानदेश ताब्यात घेतला. भाजपचे बळ वाढण्यास आणि या पक्षाचे नेतृत्व करणारे अनेक चेहरे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे भाजपमधील नाराज चेहरे पडद्याआड असले तरी आगामी लोकसभा, विधानसभा आणि काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटताना दिसतील.

आमदारांवर जबाबदारी

खानदेशच्या नेतृत्वाची धुरा काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी अनेक वर्षे सांभाळली. वयोमानापरत्वे त्यांच्यावर काही मर्यादा आल्या तरी त्यांचा करिष्मा अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे त्यांची बरीचशी जबाबदारी त्यांचे सुपुत्र आमदार कुणाल पाटील यांनी समर्थपणे पेलली आहे.

आमदार पाटील हे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या फळीतील तरूण नेतृत्व मानले जातात. त्यामुळेच त्यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. स्वाभाविकपणे खानदेशची जबाबदारी आमदार पाटील यांच्या खांद्यावर आहे.

काँग्रेसपुढे आव्हान

पूर्वी धुळे तालुक्यातील पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था या काँग्रेसच्या अर्थात पाटील पितापुत्रांच्या नेतृत्वात राहिल्या. कालांतराने पंचायत समिती हातून निसटली, मात्र बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजप व मित्र पक्षाला धुळ चारत धुळे ग्रामीण मतदारसंघात पकड अधिक घट्ट केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशात सत्ताधाऱ्यांशी दोन हात करताना जिल्ह्यात काँग्रेसला नवीन कार्यकर्ते तयार करता आलेले नाहीत. काँग्रेसचे इतर प्रमुख सेल प्रभावी कामगिरी करताना दिसत नाहीत. प्रमुख सहा ते सात चेहरे सोडले तर काँग्रेसमध्ये नव्याने लढाऊ बाण्याचे चेहरे चमकताना दिसत नाहीत.

त्यामुळेच कार्यकर्त्यांची जडणघडण करणे, पक्षाच्या विचारांना पुनर्जीवीत करून त्यांची रूजवणी करण्याचे आव्हान जिल्ह्यातील पक्षीय नेतृत्वाला पेलावे लागणार आहे. धुळे तालुक्यात काँग्रेसी विचारांच्या संस्था, नव्या कार्यकर्त्यांच्या जडणघडणीचा प्रयोग झाला तर तो जिल्ह्यात विस्तारता येऊ शकेल, असे काही कार्यकर्त्यांना वाटते.

धुळे शहरावर नजरा

धुळे शहरात सत्ताधारी भाजपकडे असलेल्या महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि भाजप पक्षांतर्गत गटबाजीचा शहराच्या विकासावर परिणाम, विकास कामांच्या गुणवत्तेकडे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याने या पक्षावर नाराजीची सुप्त लाट असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. त्यामुळे येत्या महापालिका, नंतर धुळे शहर विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची कशी मोट बांधली जाते,

भाजपवरची नाराजी कशी `कॅच` केली जाते, माजी मंत्री पाटील यांच्या करिष्माचा कसा लाभ घेतला जातो यावर काँग्रेसचे मजबुतीकरण अवलंबून असेल, असे जुनेजाणते काँग्रेसवासीय सांगतात. काँग्रेसच्या जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नुकताच येथे समारोप झाला. यानिमित्ताने जिल्ह्यात काँग्रेसने वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला. तो पुढे कसा टिकवून बळकट केला जातो हे पाहणे उचित ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT