Ashadhi Ekadashi 2023 : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त खानदेशातील प्रतिपंढरपूर बाळदे (ता. शिरपूर) येथे अनेक ग्रामीण भागातील पायी पालखी सोहळा वारकरी संप्रदाय यांच्याकडून अतिउत्साहात केला जातो.
त्यातीलच एक रामी (ता. शिंदखेडा) येथून मागील १३ वर्षांपासून ह.भ.प. महाराज गोरख लक्ष्मण माळी व त्यांच्या पत्नी सुनंदाबाई माळी यांच्या अध्यक्षतेखाली पायी पालखी सोहळा रामी ते प्रतिपंढरपूर बाळदे प्रयत्न आयोजित केला जातो. (ashadhi ekadashi 2023 walking Palki ceremony at Prati Pandharpur balade dhule news )
सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील रामी ते प्रतिपंढरपूर बाळदे पायी पालखी सोहळा आयोजित केला.
या सोहळ्याचे हे १४ वे वर्ष आहे. हा पालखी सोहळा दाऊळमार्गे जात असताना येथे शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांनी या पायी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन वारकऱ्यांसोबत चालत जाऊन नंतर शानाभाऊ सोनवणे व सुनीता सोनवणे यांनी फुगड्या खेळून भजन, अभंग गात नाचण्याचा व पायी पालखी घेऊन चालण्याचा आनंद लुटला.
या वेळी ह.भ.प. गोरख लक्ष्मण माळी, सुनंदा माळी, संतोष माळी, युवराज माळी, नितीन माळी, जनक माळी, दौलत माळी, पोपट माळी, सुखदेव माळी, देवीदास माळी, आधार माळी, शशिकांत माळी, एकनाथ रोकडे, सतीश भामरे, कुणाल माळी, भीमराव पाटील, नामदेव माळी, चुनीलाल माळी, गोपाल माळी, रत्नाबाई माळी, सुरेखा माळी, सरला माळी यांच्यासह १०० ते १५० पायी वारकरी व भजनी मंडळी पालखी सोहळ्यात सहभागी होते. या वेळी दाऊळ येथील एकनाथ रोकडे यांनी वारकऱ्यांना चहा व नाश्ता दिला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मालपूर गुरुकुलमध्ये रिंगण सोहळा
दोंडाईचा ः मालपूर (ता. शिंदखेडा) येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. रिंगण सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष युवराज सावंत, सचिव कैलाल सावंत, प्राचार्य परमेश्वरी राजकुमार, उपप्राचार्य धनंजय नेरीकर यांनी चिमुकल्या वारकऱ्यांचे कौतुक केले. मनोहर पाटील, उत्कर्ष चौधरी, दिनेश लोहार, नरेश मासुडे, दादा महाले मनीषा माळी, किरण पाटील, हेमा भोई, रेखा मोरे, श्रीमती रेवती, कावेरी राजपूत, गायत्री राजपूत आदी उपस्थित होते. योगेश बागले यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा कुलकर्णी यांनी आभार मानले.
विखरणला पोलिसांचे आवाहन
विखरण ः प्रतिपंढरपूर मानले जाणारे विखरण (देवाचे) येथे आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी भरणारी यात्रा व बकरी ईद हे दोन धर्मीयांचे उत्सव एकाच दिवशी येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन दोंडाईचा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी केले.
येथे आषाढी एकादशीला यात्रा भरते व याच दिवशी मुस्लिम बांधवाचा बकरी ईद सण असतो. या वेळी सरपंच प्रतिनिधी महेंद्र पवार, उपसरपंच प्रतिनिधी उमेश साळुंके यांनी पोलिस निरीक्षक पवार यांचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.