Asphalting work is in progress on the new concrete road between Jaihind Chowk and Indira Garden in the city. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule: नव्याकोऱ्या काँक्रिट रस्त्यावर डांबराचा लेप! निकृष्ट काम झाकण्यासाठी उपद्‍व्याप; ठेकेदार ब्लॅकलिस्टचे निर्देश

आयुक्तांकडे तक्रार केली असता संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : साधारण दोन कोटी रुपये खर्चून काँक्रिटीकरण केलेल्या नव्याकोऱ्या रस्त्यावर डांबरीकरणाचा लेप देण्याचा अजब-गजब आणि तेवढाच गंभीर प्रकार धुळे शहरात पाहायला मिळाला. प्रभागातील एका जागरूक नागरिकाने या प्रकाराची पोलखोल केली.

आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

माजी महापौर, आयुक्त, शहर अभियंता व दोन प्रभागांचे आठ नगरसेवक ज्या भागात राहतात, त्या भागातील हा प्रकार म्हणजे ‘.... कुत्रं पीठ खातं’ असा असल्याचे तक्रारदार नागरिकाने सांगितले. (Asphalt coating on new concrete road subterfuge to cover up shoddy work Instructions for Contractor Blacklist Dhule)

शहरातील प्रभाग ४ मधील माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचे निवासस्थान ते इंदिरा गार्डनचे प्रवेशद्वार यादरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याचे पाहिल्यानंतर इंदिरा गार्डन परिसरातील जागरूक रहिवासी दीपक काकुस्ते यांना ही बाब खटकली.

कारण काही दिवसांपूर्वीच या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारणा केली, तर ठेकेदाराने हा मुंबई पॅटर्न असल्याचे व या डांबरीकरणाबाबत आयुक्तांनी आदेश दिल्याचे उत्तर श्री. काकुस्ते यांना दिले.

श्री. काकुस्ते यांनी आयुक्तांचा आदेश दाखवा, असे ठेकेदार श्री. पाटील यांना सांगितले. त्यावर ठेकेदार पाटील यांनी आयुक्तांचे तोंडी आदेश असल्याचे म्हणत वेळ मारली. दरम्यान, श्री. काकुस्ते यांनी हा सर्व प्रकार सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते व्हायरल झाले.

वंदे मातरम प्रतिष्ठानच्या बैठकीतही आपण हा विषय मांडून आवाज उठविण्याची मागणी केल्याचे श्री. काकुस्ते म्हणाले. तसेच आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्याकडेही त्यांनी याबाबत तक्रार केली.

ठेकेदार ब्लॅकलिस्टचे निर्देश : आयुक्त

संबंधित रस्त्याबाबत माजी नगरसेवक नागसेन बोरसे व इतर बऱ्याच जणांनी आपल्याकडे तक्रार केली आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावे. निकृष्ट दर्जाचे काम नव्याने करून घ्यावे, अशा सूचना फायलीवर दिल्या आहेत.

निकृष्ट काँक्रिट रस्त्यावर डांबरीकरणाचा लेअर टाकून दुरुस्ती करणे हा काही पर्याय असू शकत नाही. असा प्रकार कधीही मान्य केला जाणार नाही.

संबंधित ठेकेदाराला आहे त्या स्थितीत काम थांबविण्याचे व ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना शहर अभियंता कैलास शिंदे व कनिष्ठ अभियंता हेमंत पावटे यांना दिल्या आहेत असे आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी सांगितले.

संबंधित ठेकेदाराला त्या कामाचे एक रुपयाही बिल दिले जाणार नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपैकी कुणी अशी दिशाभूल करून कामे करत असल्याचे निदर्शनास येईल.

ज्या अभियंत्यांच्या भागातील असे काम असेल त्या अभियंत्यांची विभागीय चौकशी व डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाहीत, असे आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT