land Auction  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : जप्त जमिनीचा 17 नोव्हेंबरला लिलाव

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तालुक्यातील धिरजगाव, अक्राळे, वडवद, नांदर्खे, अमळथे व गुजरजांभोली येथील खाणपट्टाधारक यांच्याकडे सरकारी भरणा प्रलंबित असून प्रलंबित रक्कमेचा भरणा न केल्यामुळे जप्त जमिनीचा लिलाव १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी बाराला तहसील कार्यालय नंदुरबार येथे करण्यात येणार असल्याचे तहसीलदार नितीन गर्जे यांनी कळविले आहे. (Auction of seized land on November 17 in nandurbar news )

सदर जमीनी जप्त करण्यात आलेल्या असून या जमिनीवर महाराष्ट्र शासन असे नाव लावण्यात आले आहे.

खाणपट्टाधारक ईटीएस मोजणी आधारे तफावतीनुसार खाणपट्ट्यातील गौणखनिज उत्खनन तफावतीप्रमाणे येणारे स्वामित्वधनाची प्रलंबित रक्कम सक्तीने वसुली करण्याबाबत नोटीस व आदेश देण्यात आलेले होते.

परंतु संबंधित खाणपट्टाधारक यांनी ईटीएस मोजणी तफावतीमधील रकमेचा भरणा अद्यापपर्यंत केलेला नसल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियममधील तरतुदीनुसार जप्त केलेल्या जमिनीवर जमीन महसुलाची थकबाकी समजून जप्त जमीन लिलाव करून लिलावातून प्राप्त होणारा महसुल चलनाने शासन जमा करणे आवश्यक आहे.

त्यामुळे सदर जमिनीचे लिलाव करण्यात येणार आहे. यावेळी नंदुरबार तालुक्यातील लिलावात सर्व इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार श्री. गर्जे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAKAL Sting Operation : ‘ट्रॅव्‍हल्‍स’कडून प्रवाशांच्‍या खिशावर डल्ला; ऐन दिवाळीत अवास्‍तव भाडे आकारणी

IND A vs AUS A: साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल शतकाच्या उंबरठ्यावर: भारताचे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला दमदार प्रत्युत्तर

Arvind Sawant: शायना एनसींवर खरंच आक्षेपार्ह टीका केली का?; अरविंद सावंत म्हणतात, हिंदीत...

IND vs NZ, 3rd Test: जडेजाच्या ५ अन् वॉशिंग्टनच्या ४ विकेट्स; पहिल्याच दिवशी किवींचा डाव गडगडला, आता भारताच्या फलंदाजांची कसोटी

Latest Marathi News Updates: विरोधकांना महिलांचे सक्षमीकरण नको आहे - श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT