शिरपूर (जि. धुळे) : अवैधरीत्या सावकारी (illegal Money lendering) करुन लुबाडल्याच्या गुन्ह्यात १४ संशयितांचा अटकपूर्व जामीन (Bail) अर्ज धुळे जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. या गुन्ह्यात एकूण २३ संशयितांचा समावेश असून सर्वजण फरारी आहेत. (Bail of suspects in money lenders case rejected dhule Latest Crime News)
येथील कुणाल हरीलाल जुलवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी जुलवाणी यांनी संशयितांकडून वेळोवेळी ३४ लाख पाच हजार रुपये घेतले.
त्या मोबदल्यात संशयितांना ४९ लाख ४३ हजार रुपये परत केले. मात्र त्यानंतरही जुलवाणी यांच्याकडे कर्ज थकीत असल्याचे सांगून संशयितांनी त्यांच्या घरातून लॅपटॉप व इतर साहित्य उचलून नेले. त्यांच्याकडून कोरे धनादेश, स्टँपही घेतले.
या छळाला कंटाळून जुलवाणी यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. तेव्हापासून सर्व २३ संशयित फरारी असून त्यांच्यापैकी १४ जणांनी जिल्हा न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
सरकारी लोकअभियोजक अॅड.अजय सानप, अॅड.किशोर सोनवणे व तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा त्याची व्याप्ती मोठी असू शकते, गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल, अनेक दस्तऐवज व यातील गुन्हेगारांची साखळी उजेडात आणण्यासाठी संशयितांना अटक करणे गरजेचे आहे असे प्रतिवेदन सादर करुन युक्तिवाद केला. न्या. एम. जे. बेग यांनी उभयपक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर अटकपूर्व जामीन फेटाळला.
संशयितांची संख्या वाढणार या गुन्ह्यात जुलवाणी व त्यांच्या नातलगांनी ऑनलाइन दिलेल्या पैशांचा तपास करताना २३ संशयितांव्यतिरिक्त आणखी काही जणांची अकाउंट्स आढळली आहेत.
त्यांचा या प्रकरणात कसा सहभाग आहे याविषयी पोलिस निश्चित मतापर्यंत पोचले असून लवकरच त्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.