पुरुषोत्तमनगर (जि.नंदुरबार) : निर्यातक्षम केळी उत्पादन होत असल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली औरंगपूर (ता. शहादा) येथील केळी (Banana) आता सातासमुद्रापार पोचत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला आहे. (Bananas from Saharanpur at foot of Satpura are now reaching across world nandurbar news)
येथील केळीचे आणखी ब्रॅन्डिंग झाल्यास क्षेत्र वाढण्यासोबतच एक्स्पोर्टसाठी मदत होणार आहे. यासाठी शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार हे तीन तालुके केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यात शहादा येथील विविध जातीचे वाण नावारूपाला आले आहेत. आकाराने मोठी, लांब आणि चवीला गोड असणाऱ्या या केळीला भारतातील पंजाब, हरियाना, दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर आखाती देशांतही ही केळी जाते. परिसरातील व्यापाऱ्यांच्या मदतीने तब्बल २० हजार टन केळी विदेशात पाठविली जाणार, असे निर्यातदारांनी सांगितले.
शहादा तालुक्यात शेतातच केळी तोडून त्यावर प्रक्रिया केली जाते. जास्त दिवस टिकावी यासाठी नैसर्गिक प्रक्रिया करून ती हवाबंद खोक्यांमध्ये पॅक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यास जास्तीचा भाव मिळत आहे, केळी उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार या तालुक्यांची निवड केली जाते. केळीच्या घडापासून फण्या वेगवेगळ्या करून बुरशीनाशक औषधामध्ये धुऊन घेतले जाते. त्यानंतर क्रेटमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून कंटेनर मंबईला पाठविण्यात येतात.
मुंबईत जेएनपीटीमध्ये प्री-कूलिंग करून कोल्डस्टोअरेजच्या माध्यमातून जहाजाने ती दुबईला पाठविण्यात येते. दुबईतून बाकी देशांना केळीची निर्यात होते. विशेष म्हणजे केळीच्या निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनाची कुठलीही मदत अथवा मार्गदर्शन या शेतकऱ्यांना लाभलेले नाही. केवळ स्वतःच्या हिमतीवर व मेहनतीवर केळीची निर्यात करीत आहेत.
"माझ्याकडे एकूण १५ एकर शेती असून, निम्म्या शेतीत केळीच करतो. या वर्षी केळीला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळत असून, एक्स्पोर्टमुळे अजून चांगला भाव मिळत आहे. एका झाडाला मला साधारण ६० ते ७० रुपये खर्च लागला असून, त्यातून झाडामागे अंदाजे ५०० ते ६०० रुपयांचा अधिकचा भाव उत्पन्न मिळेल." -सुरेश गिरधर पाटील, शेतकरी, औरंगपूर (ता. शहादा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.