Mayor Pratibha Chaudhary, Commissioner Amita Dagde-Patil, Bharti Mali, Jayashree Ahirrao, Vaishali Shirsat, Mayadevi Pardeshi, Deputy Commissioner Dr. Sangeeta Nandurkar etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Navratri 2023 : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 219 मुलींना ‘सुकन्या’चा लाभ; मनपात कुमारिकापूजन

सकाळ वृत्तसेवा

Navratri 2023 : नवरात्रोत्सवानिमित्त महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दहा वर्षांखालील बालिकांचे अर्थात कुमारिका पूजनाचा कार्यक्रम सोमवारी (ता.२३) महापालिकेत झाला. दरम्यान, यानिमिमित्ताने २१९ मुलींना केंद्र शासनाच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभही देण्यात आला.

या योजनेचा पहिला हप्ता महापौर, आयुक्त, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या वतीने अदा करण्यात आला.(Benefits of Sukanya scheme to 219 daughters of sanitation workers dhule news)

धुळे महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दहा वर्षांखालील कुमारिकांचे पूजन महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते झाले. मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कुमारिका या आदिशक्तीचे रूप असून, त्यांचे पूजन व त्यांच्या भविष्याची सुरक्षितता या उद्देशाने बालिका पूजनाचा हा कार्यक्रम नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून घेण्यात आला.

या आदिशक्तींना मी वंदन करते अशा भावना याप्रसंगी महापौर श्रीमती चौधरी यांनी व्यक्त केल्या. नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीचे रुप असलेल्या कुमारिकांचे पूजन करण्याची धार्मिक परंपरा व संस्कृती आहे. यानुसार धुळे महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी यांच्या श्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या दहा वर्षाखालील कुमारिका मुलींचे पूजन करण्यात आले.

सुकन्या योजनेचा लाभ

दरम्यान, यानिमित्ताने या बालिकांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचाही त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी योजनेचा पहिला हप्ता महापौर श्रीमती चौधरी, आयुक्त श्रीमती दगडे-पाटील व इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्यावतीने अदा करण्यात आला. योजनेच्या प्रथम हप्त्याची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली.

आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी दहा बालिकांची जबाबदारी घेतली. पालकांनी नियमित ठरावीक रक्कम अदा करून आपल्या कन्येचे भविष्य सुरक्षित करावे व त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करावा असे आवाहन मान्यवरांनी याप्रसंगी केले. उपायुक्त डॉ. संगिता नांदूरकर यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी सुकन्या समृद्धी योजनेची माहिती व महत्त्व मनोगतातून मांडले.

सभागृह नेत्या भारती माळी, भाजप महिला आघाडी अध्यक्षा मायादेवी परदेशी, वैशाली शिरसाट, भारती चौधरी, मिना सातभाई, योगिता घोडके, नगरसेवक सुनील बैसाणे, अमोल मासुळे तसेच महादेव परदेशी, शिवाजीराव चौधरी, मुख्य स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, राजेश वसावे तसेच पालक व मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वाहीदअली यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT