Dhule News : शहरवासीयांच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सोय व्हावी या अनुषंगाने धुळ्यात चार ठिकाणी अभ्यासिका बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली.
यातील कबीरगंज भागातील अभ्यासिकेचे आमदार शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. २५ लाख रुपये खर्चातून हे काम होणार आहे. (Bhoomipujan performed by MLA Shah of 25 lakh Abhyasika of Kabirganj area dhule news)
महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजनेंतर्गत या अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत. शहरातील वीटभट्टी देवपूर, साक्री रोड, कबीरगंज व जिरेकरनगर येथे या अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत.
मुस्लिमबहुल वसाहतींमध्ये लहान घरे, गरिबी परिस्थिती यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती खुंटते. ही बाब लक्षात घेऊन प्रभाग-३ मधील वीटभट्टी, प्रभाग-१२ मधील कबीरगंज येथे अभ्यासिका प्रस्तावित केली.
त्यातील कबीरगंज सर्व्हे नंबर-४०३ (जुन्या हबिबी शाळेजवळ) २५ लाख रुपये खर्चातून अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या कामाचे आमदार श्री. शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. याप्रसंगी नासिर पठाण, आमिर पठाण, डॉ. सरफराज अन्सारी, साजिद साई, डॉ. दीपश्री नाईक, इक्बाल शाह.
निजाम सय्यद, हारून खाटीक, आसिफ शाह, शोएब मुल्ला, शाहिद शाह, सुलेमान मलिक, हालिम शमसुद्दीन, नाजीम शेख, ॲड. जुबेर अन्सारी, बबलू अन्सारी, लल्या अन्सारी, युनूस शेख, जावेद खाटीक, मुस्ताक शेख, रियाज शाह यांच्यासह परिसरातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.